गुरूच्या पत्नीच्या प्रेमात पडला, घरातून पळवून केलं लग्न, बॉलिवूडमधील विश्वास बसणार नाही अशी Love Story

Bollywood Love Story : तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी लव्हस्टोरीबद्दल आम्ही सांगणार आहोत. ही स्टोरी आहे एका गुरु आणि शिष्याची. गुरुपासून गायनाचे धडे घेत असताना त्यांच्या पत्नीच्या प्रेमात पडला शिष्य...

| Aug 07, 2024, 16:54 PM IST
1/7

ही लव्हस्टोरी आहे गायक रूपकुमार राठोड यांची. त्यांनी बॉलिवूडमध्ये गायक, संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवलाय. त्यांच्या आवाजाने चाहते मंत्रमुग्ध व्हायचे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ते एक तबलावादक पण आहेत.   

2/7

करिअरच्या सुरुवातीला त्यांनी भजन गायक अनुप जलोटा यांच्या टीमसोबत काम केलं. गुरू अनूप जलोटा यांच्याकडून त्यांनी अनेक बारकावे शिकले आणि नंतर त्यांनी स्वत: चे शो सुरु केले. कामानिमित्त त्यांना अनुप जलोटा यांच्या घरी जावं लागायच.   

3/7

त्यावेळी अनुप जलोटा यांची पहिली पत्नी सोनाली सेठ यांच्याशी त्यांची ओखळ झाली. मग मैत्री काही काही काळानंतर या मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं.   

4/7

रूपकुमार राठोड हे त्यावेळी अनूप जलोटा यांच्या तालमीत तबला वाजवायचे. 1984 मध्ये अमेरिकेतून अनुप जलोटा यांचा शो करण्याची ऑफर आली होती. अनूप हे पत्नी सोनालीला सोबत चल म्हणाले. पण सोनालीने सोबत जाण्यास नकार दिला. मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवल्यास सोनालीने नकार देण्यामागे तिचं आणि रूप कुमारचं अफेअर होतं. 

5/7

हा तोच क्षण होता जेव्हा अनुप भारतात नसताना सोनाली या घरातून पळून रूप कुमारसोबत गेल्या. हे अनूप यांना समजल्यावर इतका राग आला की त्यांनी रूप कुमार यांना इंडस्ट्रीत काम मिळू नये यासाठी त्यांनी अनेक वर्षे प्रयत्न केलं. पण रूम कुमारचा भाऊ श्रवण सिंह राठौर देखील बॉलिवूडमध्ये होता, त्यामुळे त्यांना काम मिळत राहिले. 

6/7

रूप कुमार आणि सोनालीने 4 वर्षे त्यांचं अफेयर लपवलं होतं. पण दोघांनी 1989 मध्ये लग्न केलं. मात्र, त्यांच्या नात्यामुळे रूपकुमार राठोड यांचं नाव खराब झाले. 

7/7

त्याने 1992 मध्ये 'अंगार' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये गाण्याची सुरुवात केली पण 'बॉर्डर' चित्रपटाने त्यांचं नशीब चमकवलं. 'ए जाते हुए लम्हो', 'साडे से आते हैं', 'सावरे-सावरे' आणि 'बरसात के मौसम में' अशी अनेक हिट गाणी त्यांनी गायली. सध्या सोनाली आणि रूप यांना रीवा राठौर नावाची मुलगी असून ती गायका आहे.