Farmers Damage : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

अवकाळी पावसाने राज्यातील शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झालंय...हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला...तर गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झालं...यामुळे शेतकरी चिंतेत आहे...तसंच शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांदा, कोथिंबीर, टॉमेटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिलेयत. मात्र, शेतक-यांना मदत लवकर मिळावी या मागणीसाठी आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Mar 08, 2023, 15:30 PM IST

Rain and Farmers Damage : अवकाळी पावसाने राज्यातील शेतक-यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झालंय...हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतला...तर गारपिटीमुळे होत्याचं नव्हतं झालं...यामुळे शेतकरी चिंतेत आहे...तसंच शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांदा, कोथिंबीर, टॉमेटोला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिलेयत. मात्र, शेतक-यांना मदत लवकर मिळावी या मागणीसाठी आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

1/7

राज्यात अवकाळी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झाले आहे. केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून बागाच्या बागा जमीनदोस्त झाल्यात.

2/7

राज्यात काही भागात अवकाळी पावसानं दाणादाण उडवली आहे. अवकाळी संकटामुळे राज्यात शेतक-यांचा बेरंग झाला आहे. शेतकरी राजा हतबल झालाय. 

3/7

राज्यात 13 हजार 729 हेक्टरवर अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय. तूर्तास हाती आलेल्या माहितीनुसार शेतक-यांना तात्काळ मदत केली जाणार आहे. येवला तालुक्यातील नगरसुल आणि सायगावमध्ये गारांचा पाऊस पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, कांदा पिकांना मोठा फटका बसलाय. गेल्या दोन दिवसांपासून येवल्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस बरसतोय. 

4/7

गहू, हरभरा पीक, फळबागा उद्ध्वस्त झाल्यायत. पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिलेयत. आता प्रत्यक्ष पंचनामे सुरू होतील. त्यानंतर किती क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे, याचा योग्य आकडा दिला जाणार आहे. मात्र, शेतक-याला तातडीने मदतीची गरज आहे. 

5/7

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतक-याच्या तोंडचं पाणी पळालंय. सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रात नुकसानीचे क्षेत्र जास्त आहे.

6/7

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे टरबूज आणि खरबूज या रसाळ फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांना या अवकाळीचा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या फळ गारांच्या माऱ्यामुळे तुकडे तुकडे झाले आहेत. उभ्या फळ पिकावर रोटा मारण्या शिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. काही ठिकाणी तुरळक गारपिटीमुळे फळांना तडे गेले आहेत

7/7

अवकाळी पाऊस, खराब हवामानाचा फटका शहापूर तालुक्यात भेंडी उत्पादकांना बसला. भेंडीची कळी गळणे, भेंडीवर चिकट्या, बुरशी, तसंच पानं लाल पडून करप्या असे रोग पडलाय. हातातोंडाशी आलेलं भेंडी पीक उध्वस्त झालंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. यावर्षी भेंडीचं उत्पादन चांगलं निघायला सुरूवात झाली होती. त्यातच पाऊस आला, ढगाळ हवेमुळे रोगाचा प्रादूर्भाव वाढलाय. हवालदिल झालेल्या शेतक-यांनी सरकारकडे मदतीची मागणी केलीय.