Photos: मराठी अभिनेत्रीनं 31 डिसेंबरला गुपचूप केलं लग्न! 1 जानेवारीला Insta पाहून चाहते थक्क

Marathi Actress Secretly Married On 31 st Demeber: या अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तिने लग्न केल्याचं चाहत्यांना समजलं आहे. या अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

| Jan 03, 2025, 09:44 AM IST
1/15

tejaswinisunil

या अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून तिने अचानक चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ही अभिनेत्री कोण आहे, तिचा नवरा कोण आहे जाणून घेऊयात...

2/15

tejaswinisunil

सेलिब्रिटींचा लग्न सोहळा म्हणजे बरीच चर्चा, फोटो आणि इतरही अनेक गोष्टी ओघाने आल्याचं. मात्र आता मराठी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सरत्या वर्षाला निरोप देताना वर्षाच्या शेवटच्या दिवशी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.  

3/15

tejaswinisunil

या अभिनेत्रीनेच तिच्या लग्नाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी शेअर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

4/15

tejaswinisunil

ही अभिनेत्री लोकप्रिय 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील मुख्य अभिनेत्री आहे. काय कोण ही अभिनेत्री कळलं का? 

5/15

tejaswinisunil

अजून एक हिंट.. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेबरोबरच 'गाथा नवनाथांची', 'बाळूमामाच्या नावनं चांगभलं' आणि झी टीव्हीवरील 'काशीबाई बाजीराव बल्लाळ' या मालिकेमध्येही ही अभिनेत्री झळकली आहे. आता तरी ओळखलं की नाही?  

6/15

tejaswinisunil

नाही ओळखलं? चला आम्हीच सांगून टाकतो. तर आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय तिचं नाव आहे, तेजस्विनी सुनील (Tejaswini Sunil)!  

7/15

tejaswinisunil

संपूर्ण जग नवीन वर्षाच्या तयारीला लागलेलं असतानाच वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर 2024 रोजी तेजस्विनी विवाहबंधनात अडकली.  

8/15

tejaswinisunil

श्रीराम निजामपूरकरसोबत तेजस्विनीने लग्न केलं आहे.  

9/15

tejaswinisunil

तेजस्विनीने शेअर केलेले तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.   

10/15

tejaswinisunil

हिरव्या रंगाच्या साडीमध्ये तेजस्विनी फारच सुंदर दिसत आहे.  

11/15

tejaswinisunil

वराने पेशवाई पोशाख परिधान केला असून यामध्ये श्रीराम फारच छान दिसत आहे.   

12/15

tejaswinisunil

तेजस्विनी आणि श्रीरामने खास दाक्षिणात्य पद्धतीने विशेष फोटोशूटही करुन घेतलं आहे.   

13/15

tejaswinisunil

या दाक्षिणात्य लूकमध्येही दोघे फारच सुंदर दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

14/15

tejaswinisunil

या दाक्षिणात्य स्टाइल फोटोशूटचे फोटोही तेजस्विनीने शेअर केलेत.   

15/15

tejaswinisunil

अनेक सेलिब्रिटींनी तेजस्विनी आणि श्रीरामला वैवाहिक वाटचालीसाठी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. (सर्व फोटो - तेजस्विनीच्या इन्स्टाग्रामवरुन साभार)