Peanuts Benefits: शेंगदाणे खाण्याने आयुष्य वाढते? कसं आणि का ते जाणून घ्या

शेंगदाणे खायला तुम्हाला आवडतं का? जर तुमचं उत्तर हा असं असेल तर याचे फायदे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल. शेंगदाणे अनेक प्रकारे खाल्ले जातात. भाजलेले, तळलेले, कच्चे, भिजवलेले, उकडलेले शेंगदाणेही खातात.

Aug 23, 2023, 17:46 PM IST
1/6

Peanuts Facts

शेंगदाणे खायला तुम्हाला आवडतं का? जर तुमचं उत्तर हा असं असेल तर याचे फायदे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल. शेंगदाणे अनेक प्रकारे खाल्ले जातात. भाजलेले, तळलेले, कच्चे, भिजवलेले, उकडलेले शेंगदाणेही खातात.

2/6

Peanuts Facts

शेंगदाणे तुम्हाला दीर्घायुषी आणि निरोगी बनवतात असा निष्कर्ष संशोधकांनीही काढला आहे. जर्नल ऑफ फूड सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये शेंगदाण्यातील पोषक आणि खाण्यायोग्य प्रकारांवर एक संशोधनपर लेख प्रकाशित करण्यात आला होता. यात शेंगदाणे खाणं आरोग्यदायी असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे.

3/6

Peanuts Facts

प्रथिने, फायबर, पॉलिफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे शेंगदाण्यात आढळतात. शेंगदाणे भाजून आणि उकळले जातात तेव्हा बायोएक्टिव्ह संयुगांचे प्रमाण वाढते. 

4/6

Peanuts Facts

उकडलेले शेंगदाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याचे संशोधनात सांगण्यात आलं आहे. शेंगदाण्यात लोह मुबलक प्रमाणात असते. यामुळे दिवसभर उत्साही राहतो. 

5/6

Peanuts Facts

चीनच्या शांघाय युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, पाण्यात भिजवलेले शेंगदाणे कोरड्या शेंगदाण्यापेक्षा जास्त फायदेशीर असतात. भिजवलेल्या आणि अंकुरलेल्या शेंगदाण्यांमध्ये फेनोलिक कंपाऊंडचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.

6/6

Peanuts Facts

कच्च्या आणि भाजलेल्या शेंगदाण्यांच्या तुलनेत उकडलेल्या शेंगदाण्यात जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटिऑक्सिडंट कर्करोग, हृदयविकार आणि इतर आजार टाळण्यास मदत करू शकतात.