Dream Science: स्वप्नात तुम्हाला तहान लागली तर...; पाहा काय असतो अशा स्वप्नांचा अर्थ

आपण प्रत्येकजण स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नांच्या मागे काहीतरी अर्थ असतो. स्वप्नशास्त्रात या स्वप्नांचा अर्थ सांगण्यात आला आहे.

| Apr 04, 2024, 18:40 PM IST

Dream Science: आपण प्रत्येकजण स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नांच्या मागे काहीतरी अर्थ असतो. स्वप्नशास्त्रात या स्वप्नांचा अर्थ सांगण्यात आला आहे.

1/7

शास्त्रात असं म्हटलंय की, स्वप्ने आगामी काळात शुभ आणि अशुभ परिणाम दर्शवतात. 

2/7

आज आम्ही तुम्हाला स्वप्नात तहान लागणे आणि स्वतःला पाणी पिताना पाहण्याचा अर्थ सांगणार आहोत.

3/7

असे मानलं जातं की, स्वप्नात तहान लागणे आणि स्वप्नात स्वतःला तहानलेले पाहणे हे एक शुभ स्वप्न आहे. 

4/7

या स्वप्नाचा अर्थ असा आहे की, तुम्हाला काहीतरी साध्य करण्याची तीव्र इच्छा आहे.

5/7

दुसरीकडे, जर स्वप्नात पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल, तर आगामी काळात तुम्हाला तुमच्या योजनेत यश मिळेल, असा त्याचा अर्थ असू शकतो

6/7

जर तुमच्या स्वप्नात तुम्ही तहान लागल्यावर तुम्हाला दुसरी व्यक्ती पाणी देते, याचा अर्थ तुम्हाला कोणाची तरी मदत मिळू शकणार आहे.

7/7

स्वप्न विज्ञानानुसार, जर तुम्ही तुमच्या स्वप्नात वारंवार स्वतःला तहानलेले पाहत असाल तर हे लक्षण आहे की तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असल्याचं आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती स्वप्न शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)