Diwali 2023 : लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हुकला? पाहा आज काय आहेत सोन्या-चांदीचे दर

Gold Silver Rate Today : सोन्याचे नवे दर पाहता तुम्ही आज सोनं खरेदीचा बेत आखू शकता असं म्हणायला हरकत नाही.   

Nov 13, 2023, 09:38 AM IST

Gold Silver Rate Today : लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांनीच यंदा सोनं खरेदीसाठी पेढी आणि सराफांच्या दुकानांची वाट धरली. सोन्याचं वळं घेण्यापासून काहींनी दणक्यात दागिन्यांचीही खरेदी केली. 

 

1/7

सोन्याचे दर किती?

Diwali 2023 Gold Silver Price Today 13 nov latest update

(Gold Price Today) मुळात सोन्याचे दर किती हे पाहून ते खरेदी करण्याचा विचार करणाराही एक मोठा वर्ग आहे. कारण हा वर्ग सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीकडेही एक गुंतवणूक म्हणून पाहतो.   

2/7

मुहूर्त हुकला?

Diwali 2023 Gold Silver Price Today 13 nov latest update

तुम्हीही अशाच वर्गापैकी असाल आणि सोनं खरेदीचा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हुकला असेल तर आजचा दिवस हातचा जाऊन देऊ नका. 

3/7

किंचित घट

Diwali 2023 Gold Silver Price Today 13 nov latest update

सोमवारी ताज्या आकडेवारीनुसार सोन्याच्या दरांमध्ये किंचित घट झाली, तर चांदीचे दर स्थिर आहेत. 

4/7

ताजे दर...

Diwali 2023 Gold Silver Price Today 13 nov latest update

मुंबईमध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 60590 रुपये इतका दर आकारला जात आहे. रविवारच्या तुलनेत हा दर काहीसा कमी आहे. चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रती 10 ग्रॅमसाठी 61080 रुपये मोजावे लागत आहेत.   

5/7

चांदीची किंमत

Diwali 2023 Gold Silver Price Today 13 nov latest update

तर एक किलो चांदीसाठी 73000 रुपये मोजावे लागत आहेत. शनिवारीसुद्धा हेच दर असल्याचं पाहायला मिळालं होतं.   

6/7

सोनं खरेदी करायचा विचार

Diwali 2023 Gold Silver Price Today 13 nov latest update

दरम्यान, दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही सोनं खरेदी करायच्या विचारात असाल, तर त्याची शुद्धता नक्की तपासा. 

7/7

हॉलमार्क

Diwali 2023 Gold Silver Price Today 13 nov latest update

हॉलमार्कच्या चिन्हावरून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासून पाहू शकता. शिवाय, BIS CARE APP मधूनही तुम्ही हॉलमार्क असणाऱ्या दागिन्यांची शुद्धता तपासू शकता.