Asia Cup मधून बाहेर झाला 'हा' मोठा खेळाडू; टीमला धक्क्यावर धक्के!

Sri Lanka national cricket team :  श्रीलंकन क्रिकेट संघातील स्टार प्लेयर्स दुखापतग्रस्त झाल्याने आता लंकन टीम टेन्शनमध्ये असल्याचं पहायला मिळतंय.

| Aug 29, 2023, 10:26 AM IST

Dilshan Madushanka ruled out of Asia Cup 2023 : श्रीलंकन क्रिकेट संघातील स्टार प्लेयर्स दुखापतग्रस्त झाल्याने आता लंकन टीम टेन्शनमध्ये असल्याचं पहायला मिळतंय.

1/7

फक्त काही तास शिल्लक

आशिया कप सुरू होण्यासाठी आता फक्त काही तास शिल्लक आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. अशातच आता श्रीलंकेच्या संघाला धक्क्यावर धक्के बसल्याचं पहायला मिळत आहे.

2/7

श्रीलंकेला चार मोठे धक्के

डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेला चार मोठे धक्के बसले आहेत. संघातील स्टार प्लेयर्स दुखापतग्रस्त झाल्याने आता लंकन टीम टेन्शनमध्ये असल्याचं पहायला मिळतंय.

3/7

दुखापतग्रस्त

श्रीलंका संघाचा अष्टपैलू वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) आणि वेगवान गोलंदाज दुष्मंत चमीरा (Dushmantha Chameera) बाहेर पडले होते. दुखापतीमुळे त्यांना खेळता येणार नाही.

4/7

आशिया चषक 2023

डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका (Dilshan Madushanka) आणि लाहिरु कुमारा (Lahiru Kumara) हे खेळाडू आशिया चषक 2023 स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे

5/7

पहिला सामना

श्रीलंकेचा पहिला सामना हा बांग्लादेशविरुद्ध 31 तारखेला खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना हा अफगाणिस्तानविरुद्ध 3 तारखेला खेळवला जाईल.

6/7

विजेतेपद

मागील वर्षी दसुन शनाका (Dasun Shanaka) याच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने पाकिस्तानला फायनल सामना पराभूत करत विजेतेपद पटकावलं होतं.

7/7

श्रीलंकेचा जाहीर झालेला संघ

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, चैरिथ असालंका, सदीरा समरविक्रमा, धनंजय डी सिल्वा, दुशान हेमंथा, डुनिथ वेललेज, महीश थीक्षाना, प्रमोद मदुशन, कसुन राजिथा, दिलशान मदुशंका, मथीशा पथिराना.