व्हिस्की, व्होडका, रम, वाईन, बीअरमध्ये फरक काय? कशात आहे जास्त नशा
मद्यप्रेमींचा स्वत:;चा एक ब्रँड ठरलेला असतो, कोणाला व्हिस्की आवडते तर व्होडकाचा शौकिन असतो. पण तुम्हाला माहित आहे का व्हिस्की, व्होडका, रम, वाईन, बीअरमध्ये फरक काय आहे. कोणत्या मद्यात जास्त प्रमाणात अल्कहोल असतं. (दारु पिणं हे आरोग्यासाठी हानीकारक आहे)
1/7
2/7
रम या मद्याच्या प्रकारात अल्कहोलचं प्रमाण जास्त असतं. जवळपास 40 टक्क्याहून अधिक अल्कोहोल असल्याने याची नशा जास्त असते. थंडीच्या हंगामात रम पिणं जास्त पसंद केलं जातं. रम बनवण्यासाठी उसाचा रस आंबवला जातो. यानंतर त्याचं डिस्टिलेशन केलं जाते. जळलेल्या ओक किंवा लाकडी बॅरलमध्ये रम काही काळ साठवल्याने त्याचा रंग गडद आणि चव अधिक तीव्र होते. काहीवेळा रंग आणि चवीसाठी रममध्ये गूळ, जळलेली साखर किंवा कारमेल मिसळलं जातं.
3/7
पाण्याप्रमाणे पारदर्शक दिसणार्या व्होडकामध्ये 40 ते 60 टक्के अल्कोहोलचं प्रमाण असतं. त्यामुळे व्होडकाचा अंमल लवकर होतो आणि दीर्घकाळ टिकतो. त्याचे उत्पादन रशिया आणि पूर्व युरोपमध्ये सर्वाधिक आहे. व्होडका हे मद्य हे धान्य आणि मोलॅसिसपासून बनवलं जातं. याशिवाय धान्य, ज्वारी, कॉर्न किंवा गहू पासूनही व्होडका बनवला जातो. गव्हापासून बनविलेले वोडका सर्वोत्तम मानला जातो.
4/7
वाईन लाल आणि पांढर्या रंगात येते. त्यात अल्कोहोलचे प्रमाण कमी असतं. वाईन अगदी सौम्य असून त्यात 9 ते 18 टक्के अल्कोहोल असतं. द्राक्षापासून प्रामुख्याने वाईन तयार केली जाते. रेड वाईन लाल किंवा काळ्या द्राक्षांच्या लगद्यापासून बनविली जाते. व्हाईट वाईन आंबवलेल्या रसापासून बनविली जाते. त्यासाठी द्राक्षाचा रस काढला जातो. यामध्ये सालींचा उपयोग होत नाही.
5/7
6/7