'या' ग्रहावर पडतो हिऱ्यांचा पाऊस! हिऱ्यांचा खजिना पृथ्वीवर कसा आणता येतील?

बुध ग्रहाबाबत संशोधकांनी मोठा दावा केला आहे. या ग्रहावर मोठ्या प्रमाणात हिरे असल्याचा संशोधकांचा दावा आहे. 

वनिता कांबळे | May 27, 2024, 00:17 AM IST

Diamond On Mercury Planet : बुध ग्रहाबाबतच्या संशोधनाबाबत नविन खुलासा झाला आहे. या ग्रहावर हिरे असल्याचा चिनी संशोधकांचा दावा आहे. ग्रॅफाईटमुळे हा ग्रह गडद रंगाचा दिसतो. हे हिरे पृथ्वीवर आणणे शक्य आहे का? जाणून घेवूया. 

1/7

आपल्या सौरमालिकेतील बुध या ग्रहावर दडलाय हिऱ्यांचा खजिना दडला आहे. चिनी वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे.     

2/7

 येथे हिरे आणि इतर प्रकारचे कार्बन जास्त असण्याची शक्यता जास्त आहे असा दावा संशोधकांनी केला आहे. 

3/7

गुरु ग्रहपर्यंत प्रत्यक्षात झेप घेणे खूपच कठिण असल्याचे संशोधकांचे मत आहे. या ग्रहावर जीवन असणे अशक्य आहे. 

4/7

बुध ग्रह पूर्णपणे हा खडकाळ ग्रह आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 77 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. 

5/7

बुध ग्रह हा आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. हा ग्रह पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे. 

6/7

दक्षिण चीनमधील झुहाई येथील सन यात-सेन विद्यापीठातील संशोधकांनी बुध ग्रहाच्या निरीक्षणादरम्यान हा ग्रह इतका काळा का दिसतो याबाबतचे संशोधन केले. 

7/7

चिनी वैज्ञानिकांनी बुध या ग्रहाच्या संशोधनादरम्यान या ग्रहाबाबतची अनेक रहस्य उलगडली आहेत.