PHOTO: ना अभिनेत्री, ना अॅक्शन, ना आयटम साँग, तरीही 'हा' चित्रपट ठरला सुपरहिट

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. असाच एक चित्रपट आहे. ज्यामध्ये ना अॅक्शन, ना आयटम साँग. मात्र, तरीही हा चित्रपट खूप हिट ठरला. कोणता आहे तो चित्रपट. जाणून घ्या सविस्तर. 

Soneshwar Patil | Sep 11, 2024, 16:58 PM IST
1/6

अनेक चित्रपट

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट असे आहेत की ते अजून प्रेक्षक खूप आवडीने बघत असतात. या चित्रपटांना प्रेक्षकांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रेम मिळालं आहे. 

2/6

सुपरहिट

अनेक चित्रपट हिट होण्याची कारणे वेगवेगळी असतात. ज्यामध्ये चित्रपटाची कथा, गाणी, डॉयलॉग किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू शकतात. मात्र, एक असाही चित्रपट आहे जो या सर्व गोष्टींशिवाय सुपरहिट ठरला आहे. 

3/6

धमाल

2007 मध्ये 'धमाल' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. इंद्र कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल देखील बनवण्यात आला होता. 

4/6

सर्वोत्कृष्ट कलाकार

या चित्रपटात जावेद जाफरी, अर्शद वारसी, आशिष चौधरी, संजय दत्त, संजय मिश्रा, असरानी यांसारखे कलाकार होते. ज्यांनी या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे. 

5/6

एकही अभिनेत्री नव्हती

'धमाल' या चित्रपटात एकही अभिनेत्री नव्हती. तरी देखील या चित्रपटाशी संबंधित अनेक खास गोष्टी आहेत. हा चित्रपट 'इट्स अ मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड'चा हिंदी रिमेक होता. 

6/6

डबल धमाल

2011 मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल आला होता. ज्याचे नाव होते 'डबल धमाल'. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट देखील खूप हिट ठरला.