कोरोना लस हवीये? तर हे कागदपत्र आवश्यक

1 मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. कोरोनाच्या लसीची किंमत साधारण 250 रुपये असेल असं सांगण्यात आलं आहे. ही लस जर तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्र असणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला ही लस घेता येणार नाही. 

Feb 28, 2021, 14:01 PM IST
1/6

कोणत्या गटाला मिळणार कोरोनाची लस

कोणत्या गटाला मिळणार कोरोनाची लस

1. 60 वर्षाहून अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांना कोरोना लस घेता येणार आहे. तर 45 ते 59 वय असलेल्या कोमॉर्बिड रुग्णांना ही लस देण्यात येणार आहे.    Picture credit: PTI

2/6

कोरोना लसीकरण मोहीम

कोरोना लसीकरण मोहीम

2. कोरोनाची लस कोणत्या खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल याची एक यादी जाहीर करणार आहे. लसीकरणाची मोहीम 1 मार्चपासून सुरू होणार आहे. या मोहिमेत वयोगटानुसार प्राधान्य दिलं जाणार आहे.    Picture credit: PTI

3/6

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक

3. कोरोनाची लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. याशिवाय योग्य कागदपत्र देखील जमा करावी लागणार आहेत. याशिवाय ऑनलाइन पद्धतीनं नोंदणी करणंही गरजेचं आहे.  Picture credit: IANS

4/6

रजिस्ट्रेशन नंतर पुढे काय?

रजिस्ट्रेशन नंतर पुढे काय?

4. रजिस्ट्रेशशन केल्यानंतर नागरिकाला त्याच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. त्यावर अधिक माहिती आणि वेळ, तारीख आणि ठिकाण याबाबत माहिती दिली जाणार आहे.    Picture credit: Reuters

5/6

कोणती कागदपत्र लागणार

कोणती कागदपत्र लागणार

5. तुम्हाला कोरोना लस घ्यायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र असणं आणि ती ऑनलाइन सॉफ्ट कॉपी जमा करणं गरजेचं आहे. मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅनकार्ड, सर्व्हिस आयडी कार्ड, MGNREGA जॉब कार्ड, पासपोर्ट, स्मार्ट कार्ड, पेन्शन ओळखपत्र, ऑफिस आयडी, बँक / पोस्ट ऑफिस पासबुक आणि हेल्थकेअर आणि अत्यावश्यक किंवा फ्रेंटलाइन काम करणारे असल्याचं त्याचं प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे.   Picture credit: IANS

6/6

ओळखपत्र गरजेचं

ओळखपत्र गरजेचं

6. ज्या व्यक्तींनी सर्व कागदपत्र ऑनलाइन जमा केली आहेत त्यांना ओळखपत्रासाठी एक कागदपत्र जवळ ठेवणं अत्यावश्यक असणार आहे. ज्यावरून आपली ओळख आणि वय दोन्ही समजू शकेल. या कागदपत्राचा आधार ओऴखीचा पुरावा म्हणून करण्यात येणार आहे.      Picture credit: Reuters