मॅकेनिक, कुली नंतर आता राहुल गांधी यांचा कारपेंटर अवतार, फर्निचर मार्केटमध्ये केलं काम

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या किर्तीनगर मधल्या फर्नीचर मार्केटला (Furniture Market) अचानक भेट दिली. तिथे त्यांनी कामगारांची भेट घेतली. एशियातलं हे सर्वात मोठं फर्नीचर मार्केट आहे. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुतारकामाचा अनुभवही घेतला. याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. 

| Sep 28, 2023, 18:21 PM IST
1/7

काँग्रेस खासदार राहुल गांधी गेल्या काही काळात सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांच्याबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मॅकनेक आणि रेल्वे स्थानकातील कुलींची भेट घेतली होती. आता राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या सर्वात मोठ्या फर्नीचर मार्केटला भेट दिली. इथल्या कामगारांशी त्यांनी गप्पा मारल्या

2/7

दिल्लीतल्य किर्तीनगरमधलं फर्नीचर मार्केट हे एशियातलं सर्वात मोठं फर्नीचर मार्केट मानलं जातं. राहुल गांधी यांनी शुक्रवारी या फर्नीचर मार्केटला अचानक भेट दिली. तिथल्या कर्मचाऱ्यांची त्यांनी विचारपूस केली. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

3/7

राहुल गांधी फर्नीचर मार्केटमध्ये आल्याचं कळताच त्यांना पाहाण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली. राहुल गांधी यांनी आपला अनुभव शेअर केला आहे. ही लोकं खूपच मेहनती असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. ही लोकं मेहनती तर आहेतच पण कमालीचे कलाकरही असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

4/7

फर्नाचर मार्केटमधल्या कामगारांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी केवळ कामगारांशी गप्पाच मारल्या नाहीत तर स्वत: सुतारकामाचा अनुभवही घेतला. भारत जोडो यात्रेचा हा हिस्सा असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. 

5/7

काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत. सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांचे अनुभव, त्यांची व्यथा राहुल गांधी जाणून घेत असल्याचं काँग्रेसने म्हटलंय. 

6/7

याआधीही राहुल गांधी यांनी सामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे. 21 सप्टेंबरला दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वे स्थानकावर जात त्यांनी तिथल्या हमालांशी चर्चा केली. रेल्वे स्थानकावरील हमालांचा ड्रेस राहुल गांधी यांनी घातला. तसंच हातावर 756 क्रमांकाचा बिल्लाही लावला. त्यानंतर डोक्यावर बॅग घेऊन त्यांनी कामही केलं. 

7/7

त्याआधी दिल्लीतल्या करोलबाग इथंल्या सायकल मार्केटला त्यांनी भेट दिली होती. इथे त्यांनी बाईक रिपेअरचं कामही केलं होतं.