दर्शना पवार हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम; का आणि कशी केली हत्या?
पुण्यातील दर्शना पवार हत्येप्रकरणी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक झालीय. लग्नाला नकार दिल्यानं खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. राहुलला 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेय.
Darshana Pawar Murder Case: एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हत्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतून राहुल हंडोरेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लग्नाला नकार दिल्यानं राहुल हंडोरेने दर्शनाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दर्शना पवार ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून सहावी आली होती. 18 जून रोजी दर्शनाचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला होता.