पाळण्यापासून पाण्यापर्यंत अन् नोकरीपासून घरांपर्यंत... इरशाळवाडीवासियांना CM भेटले तेव्हा काय काय घडलं? पाहा Photos
CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी उभारलेल्या तत्पुरत्या निवारा सोयीची पहाणी केली. यावेळीस मुख्यमंत्र्यांनी स्वत: या ठिकाणी सर्व सुविधा व्यवस्थित उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत की नाही याची तपासणी केली. तसेच त्यांनी इरशालवाडीमधील विस्थापित नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अगदी रोजगारापासून ते नवीन घरांपर्यंतची सविस्तर माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनाग्रस्तांना दिली. पाहूयात या भेटीदरम्यानचे फोटो...
1/17
2/17
3/17
काही घरांमध्ये जाऊन तेथील सुविधेची पाहणी करुन मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आपद्ग्रस्तांच्या समस्या, अडचणी मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या. या घरांमध्ये अगदी पाळण्यासारख्या लहान गोष्टींपासून रोजच्या वापराच्या गोष्टींपर्यंतच सर्वच गोष्टींची सोय करण्यात आल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या घराच्या आतील फोटोंमधून दिसत आहे.
4/17
5/17
या ठिकाणी सध्या पिण्याच्या पाण्यापासून शौचालयांपर्यंतच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था 6 महिन्यात होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपद्ग्रस्तांना दिला. सिडकोमार्फत ही कामे करण्यात येणार असून आराखडा अंतिम झाल्यावर तो ग्रामस्थांना दाखविण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
6/17
7/17
8/17
महिला व पुरुषांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या योजनेतर्गत बचतगटाच्या माध्यमातून प्रत्येक गटास साडेसात लाख रुपये प्रमाणे व्यवसायासाठी मदत देण्यात येईल. तसेच बँक खाते देखील उघडण्यास मदत केली जाईल असे ही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना मिठाई वाटून स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा केला.
9/17
10/17
11/17
12/17
13/17
ज्या दिवशी इरशाळवाडी दुर्घटना घडली त्यादिवशी मुख्यमंत्री शिंदे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देखील दिवसभर त्याठिकाणी तळ ठोकून होते. मदत आणि बचावकार्यासाठी मुख्यमंत्री आवश्यक त्या सूचना देत होते. एवढेच नाही तर प्रतिकुल परिस्थितीतही भर पावसात मुख्यमंत्री शिंदे 4 तासांची पायपीट करून इर्शाळगडाजवळ जाऊन आले आणि दुर्घटनास्थळाची तसेच बचावकार्याची पाहणी करून आले. या घटनेला महिना होण्याच्या आतच 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पुन्हा इरशाळवाडीवासियांच्या भेटीसाठी गेले होते.
14/17
15/17
16/17