Shahu Maharaj : यशवंतराव घाटगे ते राजर्षी शाहू महाराज, 48 वर्षांचं आयुष्य अन् अफाट काम...

Rajarshri Shahu Maharaj : राजर्षी शाहू महाराजांची आज 101 वी पुण्यतिथी (Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2023)...त्यानिमित्याने यशवंतराव घाटगे ते राजर्षी शाहू महाराज यांचा 48 वर्षांचं आयुष्य अन् अफाट काम पाहूयात..

May 06, 2023, 11:24 AM IST

Shahu of Kolhapur : राजश्री शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यानंतर 2 जुलै 1894 रोजी शाहूजी महाराज कोल्हापूरचे राजे झालेत. लोकराजा अशी त्यांची ओळख...छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अनेक कार्य केली. (chhatrapati rajarshi shahu maharaj know about shahu maharaj kolhapur maharashtra in marathi )

1/10

अनेक अनिष्ट चालीरीती-प्रथांना त्यांनी पायबंद घातली. कृषी, सहकार, उद्योग या क्षेत्रांत त्यांनी अमुलाग्र बदल केले. 

2/10

राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई यांच्याकडे झाला. त्यांचं नाव यशवंतराव ठेवण्यात आलं.  

3/10

चौथ्या शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर यशवंतराव कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले.

4/10

बहुजन समाजातील दारिद्र, अज्ञान आणि अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केल्या. 

5/10

त्यांनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर आदी समाजासाठी वसतिगृहे स्थापन केलीत.

6/10

माणगाव आणि नागपूरमधील अस्पृश्यता निवारण परिषदांतून बाबासाहेबांसोबत त्यांनी अस्पृश्यांनासाठी संघर्ष केला. 

7/10

त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. शाहूंनी 'सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली .

8/10

कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध मिळून दिली. त्याशिवाय 'शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी देशभरात चालना दिली.   

9/10

शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूरमधील कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना 'राजर्षी' ही पदवी बहाल केली.

10/10

मुंबईत अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्यांचा हृदयविकाराच्या धक्काने निधन झालं.