Putin यांनी 'हे' एक काम केल्यास मी त्यांना पाठवेन न्यूड फोटो; अमेरिकन मॉडेलची अजब 'ऑफर'

Caprice Bourret Letter Vladimir Putin: व्लादिमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशियन सैन्याने मागील वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. यानंतर युक्रेनमध्ये मोठ्याप्रमाणात जिवितहानी झाली. युक्रेनमधील अनेक लोकांनी तर स्वत:चा देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेतला. येत्या 24 तारखेला युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होईल.

Feb 03, 2023, 19:49 PM IST
1/7

Caprice Bourret Letter Vladimir Putin

युक्रेनविरुद्ध व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पुकारलेल्या युद्धाला विरोध करण्यासाठी आणि त्याच्या दहकतेबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी नग्न होऊन फोटोशूट केल्यानंतर आता मॉडेल कॅप्रिस बोरेटने (Caprice Bourret) नवीन वक्तव्य केलं आहे. दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्यासाठी आजूनही नग्नता महत्वाची भूमिका बजवू शकते, असं बोरेट म्हणली आहे.

2/7

Caprice Bourret Letter Vladimir Putin

51 वर्षीय बोरेटने मेफेयरमध्ये मॅडॉक्स टॅवर्नमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'द लायर' या चित्रपटाच्या शोनंतर रिचर्ड ईडनशी गप्पा मारताना एक विधान केलं. "मला वाटतं की जर पुतिन युक्रेनमधून बाहेर पडले तर मी त्यांना काही न्यूड फोटो पाठवण्याचं आश्वासन देत एक पत्रही पाठवेन, त्यांनी युद्धाला पूर्णविराम दिला तर मी नक्की हे करेन," असं बोरेट म्हणाली.

3/7

Caprice Bourret Letter Vladimir Putin

पुढे बोलताना बोरेटने पुतिन जिवंत आहेत की नाही याबद्दलही मी विचार करते असंही म्हटलं. "पुतिन यांचा मृत्यू झाला आहे अशी एक अफवा मी ऐकली आहे. मला या गोष्टीची चिंता आहे की त्यांची जागा कोण घेणार? कारण जी नवी व्यक्ती येईल ती अधिक वाईट असू शकते," असंही बोरेट म्हणाली.

4/7

Caprice Bourret Letter Vladimir Putin

रशिया आणि युक्रेनमध्येमधील युद्धाला अजून तीन आठवड्यांनी एक वर्ष पूर्ण होणार आहे. मागील वर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रशियन लष्कराने युक्रेनमध्ये सैन्य कारवाई केली होती.

5/7

Caprice Bourret Letter Vladimir Putin

'मेल ऑनलाइन'ने दिलेल्या वृत्तानुसार आपल्या तारुण्यामध्ये बोरेटने एकदा चुकून अंमली पदार्थांचं सेवन करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या आपण फार स्थीर आयुष्य जगत असल्याचं बोरेट सांगते. सध्या मी जाणीवपूर्वकपणे मित्रमैत्रिणींना अधिक वेळ देण्याचा प्रयत्न करते, असंही बोरेट म्हणाली.

6/7

Caprice Bourret Letter Vladimir Putin

'ऑन अ मिशन' या पॉडकास्टमध्ये होस्ट ऐलि मॅककेबरोबर बोलताना बोरेटने एका गोष्टीची कबुली दिली. "मी चुकून एकदा ड्रग्ज घेण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या प्रियकराने त्यावेळी एका एस्पिरिनच्या बाटलीमध्ये क्वाल्यूड टाकलं होतं. यामुळे तुम्हाला गुंगी आल्यासारखं होतं. माझे पीरिएड सुरु होते त्यामुळे मी एस्पिरिन समजून दोन गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर मी जीमला गेले आणि व्यायाम करु लागले तर अचानक मला सर्वकाही अंधूक दिसू लागलं. मी जमीनीवर पडले. माझा इन्स्ट्रक्टर घाबरला. माझ्याबरोबर काय घडतं होतं हेच मला कळत नव्हतं," असं बोरेट म्हणाली.  

7/7

Caprice Bourret Letter Vladimir Putin

"मी फार मद्य सेवन करायचे. मात्र देवाचे आभार आहेत की मी ड्रग्ज घेतले नाही. कारण मी ते केलं असतं तर आज मी जिथे आहे त्या ठिकाणी नसते. त्यावेळेस जवळजवळ प्रत्येकजण ड्रग्ज घेत असताना मी त्यापासून दूर राहिले हे सुदैव आहे," असं बोरेटने सांगितलं.