फ्रिजचा दरवाजा उघडा ठेवून हवा खाताय? होऊ शकतं नुकसान

उन्हाळ्यात घरात एसी आणि फ्रीजचा खूप वापर केला जातो. थंडपणा मिळवण्यासाठी लोक त्याचा वाटेल तसा वापर करताना दिसतात. मात्र त्याच्या कशाही वापरामुळे दोघांचेही आयुष्य कमी होण्याची शक्यता आहे.   

Jun 06, 2023, 19:03 PM IST
1/6

refrigerator door

 फ्रीज त्याच्या आतील सामान थंड ठेवतो आणि ते खराब होण्यापासून रोखतो. पण कधी कधी काही जण फ्रीज खोलून त्यातील थंड हवेचा अनुभव घेतात. पण कधी विचार केला आहे का की एखादा फ्रिज खोली थंड करु शकतो का? जर आपण फ्रिजचे दार उघडून बंद खोलीत ठेवले तर खोली थंड होईल का? 

2/6

fridge compressor

कोणतीही वस्तू थंड करताना, मशीन गरम हवा बाहेर फेकते. फ्रीजबद्दल बोलायचे झाले तर त्याचा कंप्रेसर थंड होण्यासोबत वातावरणात उष्णताही सोडतो. फ्रीजमधील सेन्सर आतमध्ये थंड असताना कंप्रेसरला संदेश पाठवतात की एका विशिष्ट तापमानापर्यंत कूलिंग पोहोचले आहे आणि आता थांबवायचे आहे.  

3/6

fridge cooling

जर तुम्ही फ्रीजचा दरवाजा उघडा करुन  ठेवलात, तर सर्वप्रथम त्यामध्ये बसवलेले सेन्सर खोलीचे तापमान मोजतील. अशा स्थितीत फ्रीजला जास्त थंडावा लागणार आहे असे सेन्सरला वाटेल.

4/6

fridge coolant

त्यामुळे कंप्रेसरला वाटेल की आतील उष्णता खूप वाढली आहे आणि कूलेंट ( coolant)  अधिक वापरावा लागेल. असे करताना कंप्रेसर जास्त पावर घ्यायला सुरुवात करेल आणि मोठ्या प्रमाणात उष्णता उत्सर्जित करेल. यामुळे एकूणच खोलीचे तापमान हळूहळू वाढेल.

5/6

ice in the fridge

दुसरं म्हणजे जर फ्रीजमध्ये जास्त बर्फ जमा होत असेल तर  तुमचा फ्रीज योग्य तापमानावर सेट केलेला नसू शकतो. फ्रीजरचे तापमान -18 अंश सेल्सिअसवर सेट करणे आवश्यक आहे. या तापमानात सेट न केल्यास त्रास होऊ शकतो. जर तुमचा फ्रीज रिकामा राहिला तर त्यात आर्द्रतेमुळे जास्त बर्फ तयार होतो. शक्य असल्यास, फ्रीज नेहमी सामानाने पॅक करून ठेवा.

6/6

fridge ice

फ्रीजच्या मागील बाजूस एक पाईप असतो जो पाण्याचा निचरा करण्याचे काम करतो. जर ते थांबले तर बर्फ अधिक गोठण्यास सुरवात होते. हे टाळण्यासाठी वेळोवेळी फ्रिज स्वच्छता करत रहा. फ्रीजच्या मागील बाजूस कॉइल कंडेन्सर असतो. यामुळे फ्रिज थंड होतो. तो घाण झाल्यावर फ्रीज नीट काम करू शकत नाही.