Brain Health : आजच 'या' सवयी सोडा, नाहीतर वयाच्या आधीच मेंदू होईल म्हातारा

आपल्या शरीराचे कार्य नीट होण्यासाठी मन निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.

Mar 28, 2023, 15:52 PM IST

Brain Health : काही सवयींमुळे आपण आळशी होतो. या परिमाण आपल्या शरीरावर होतो. तुम्ही  व्यायाम केला नाही तरनेहमी सुस्त राहता. त्यामुळे मेंदू म्हातारा होऊ लागतो. म्हणूनच तुम्ही नेहमी सक्रिय असले पाहिजे. कारण सक्रिय असणं तुमच्या शरीरासाठीही फायदेशीर आहे.

1/5

व्यायाम केला नाही तर...

व्यायाम केला नाही तर...

Brain Health : काही सवयींमुळे आपण आळशी होतो. या परिमाण आपल्या शरीरावर होतो. तुम्ही  व्यायाम केला नाही तर नेहमी सुस्त राहता. त्यामुळे मेंदू म्हातारा होऊ लागतो. म्हणूनच तुम्ही नेहमी सक्रिय असले पाहिजे. कारण सक्रिय असणं तुमच्या शरीरासाठीही फायदेशीर आहे.

2/5

मद्य सेवन टाळा

मद्य सेवन टाळा

काही लोक दारुच्या आहारी जातात. जास्त मद्य सेवन करतात. पण तुम्हाला माहित आहे का की अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे तुमच्या मेंदूच्या पेशी वृद्ध होऊ लागतात. त्यामुळे दारुचे सेवन सोडा.

3/5

धूम्रपान करु नका

धूम्रपान करु नका

धूम्रपान केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या मनासाठीही हानिकारक आहे. अति धुम्रपानामुळे तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

4/5

गोड खाणे टाळा

गोड खाणे टाळा

आपण पोष्टीक खात नाही. आपल्या जे आवडते ते खातो. अनेकांना जास्त गोड खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का की साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने मेंदू आकुंचित होऊ लागतो आणि तुमचे मन म्हातारे होऊ लागते.

5/5

हिरव्या भाज्यांचे सेवन करा

हिरव्या भाज्यांचे सेवन करा

आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. हिरव्या भाज्यांचे सेवन न केल्याने तुमची त्वचा आणि केस तसेच तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. हिरव्या भाज्यांचे सेवन न केल्याने तुमचा मेंदू म्हातारा होऊ लागतो. त्यामुळे पालेभाज्या खल्ल्या पाहिजेत.