PHOTO : परिणीतीपासून सारापर्यंत 'या' 8 अभिनेत्रींनी मालदीवमध्ये केली धमाल

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या वादानंतर बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील अनेक स्टार्स मालदीव Boycott Maldives Trend सुरु झाला आहे. या वादापूर्वी परदेशातील हे ठिकाण बॉलिवूड स्टार्सच्या सुट्टीसाठी सर्वात आवडतं ठिका होतं. आतापर्यंत कोणत्या कोणत्या अभिनेत्रीने इथे सुट्टीचा आनंद लुटला आहे ते पाहूयात.  

Jan 08, 2024, 19:09 PM IST
1/9

आलिया भट्ट, सारा अली खान, जान्हवी कपूरपासून अनेक बॉलिवूड अभिनेते, अभिनेत्रींनी मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लुटला आहे. (छायाचित्र सौजन्य-इन्स्टाग्राम)

2/9

गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने राजकारणी राघव चढ्ढासोबत लग्न केल्यानंतर ती आई आणि सासूसोबत मालदीवला फिरायला गेली होती. तिने या सहलीतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (छायाचित्र सौजन्य-इन्स्टाग्राम)

3/9

आलिया भट्टनेही मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय केली आहे. या अभिनेत्रीने बीचवर बिकिनी घालून एक जबरदस्त फोटोशूटही केलं होतं. (छायाचित्र सौजन्य-इन्स्टाग्राम)

4/9

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास करणारी अभिनेत्री महिमा मकवाना हिनेही व्हेकेशनसाठी मालदीवची निवड केली होती. तिने या ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (छायाचित्र सौजन्य-इन्स्टाग्राम)

5/9

अक्षय कुमारने आता मालदीववर बहिष्कार टाकण्याची मागणी केली असली तरी तोही मालदीवला जाऊन आला आहे. अभिनेताने स्वतः सांगितले की ते अनेकदा मालदीवला सुट्ट्यांसाठी गेले होते. 2021 मध्ये, अक्षय कुमारने त्याची पत्नी ट्विंकल खन्नाचा वाढदिवस मालदीवमध्ये साजरा केला होता. (छायाचित्र सौजन्य-इन्स्टाग्राम)

6/9

 सारा अली खानने मालदीवच्या बीचवर धमाल केली आहे. हिरव्या रंगाच्या बिकिनीमध्ये तिने फोटोशूट केले होते. अभिनेत्रीच्या या लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. (छायाचित्र सौजन्य-इन्स्टाग्राम)

7/9

जान्हवी कपूरचे व्हेकेशनचे फोटोदेखील सोशल मीडियाव व्हायरल झाले होते. अभिनेत्रीचा बिकिनी लूक चाहत्यांनी पसंती दिली होती. (छायाचित्र सौजन्य-इन्स्टाग्राम)

8/9

शर्ली सेटिया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिचे मालदीवचे फोटो कोणाच्याही स्वप्नातील सुट्टीचे कल्पना करु शकता. (छायाचित्र सौजन्य-इन्स्टाग्राम)

9/9

मालदीवच्या या संपूर्ण वादात अभिनेत्री बिपाशा बसू तिचा पती करण सिंग ग्रोवर आणि मुलगी देवीसोबत मालदीवमध्ये सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे. बिपाशाने तिच्या वाढदिवसाच्या सुट्टीतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे अभिनेत्री खूप ट्रोल झाली आहे. (छायाचित्र सौजन्य-इन्स्टाग्राम)