या बॉलिवूड सेलिब्रिटींनी 'हे' 5 सुपरहिट चित्रपट नाकारले नसते, तर आज त्यांचे आयुष्य काही वेगळे असते

चला जाणून घेऊया कोण आहेत हे स्टार्स आणि ज्यांनी हे चित्रपट नाकारले.

Jun 01, 2022, 20:07 PM IST

मुंबई : भारतात चित्रपट आणि चित्रपट कलाकारांची खूप क्रेझ आहे. प्रदर्शित झालेला एखादा चित्रपट आपल्याला आवडत असेल तर त्या चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेत दुसरा कोणता अभिनेता असेल याची कल्पना करणे फार कठीण जाते. आज आम्ही तुम्हाला अशा पाच स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या काही वर्षांत बॉलिवूडचे सर्वात मोठे हिट चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे नाकारले आहेत. चला जाणून घेऊया कोण आहेत हे स्टार्स आणि ज्यांनी हे चित्रपट नाकारले.

1/5

ये जवानी है दिवानी :

 दीपिका पदुकोणने अयान मुखर्जीच्या ये जवानी है दिवानी या चित्रपटात रणबीर कपूरसोबत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात नयनाची ही भूमिका दीपिकाला नव्हे तर कतरिना कैफला देण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, तिचे आणि रणबीरचे बिघडलेले नाते आणि व्यस्त कॅलेंडरमुळे तिने हा चित्रपट केला नाही.

2/5

मुन्नाभाई एमबीबीएस :

 भारतात क्वचितच कोणी असेल ज्याला मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपटात आवडत नसेल पण तुम्हाला माहित आहे का ? की, संजय दत्तच्या आधी विवेक ओबेरॉय या चित्रपटात मुरली प्रसाद शर्माची भूमिका साकारणार होता ? पण त्याच्याकडे तारखा नसल्यामुळे ही भूमिका संजय दत्तने साकारली आहे.

3/5

अंधाधुन :

आयुष्मान खुरानाच्या सर्वात चांगल्या कामगिरीपैकी हा एक चित्रपटात आहे. अंधाधुन हा चित्रपटात अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याला ऑफर करण्यात आला होता. परंतु हर्षवर्धन इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्यामुळे त्याने हा चित्रपट नाकारला.

4/5

पिकू :

अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांनी काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पिकू या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट पहिल्यांदा परिणीती चोप्राला ऑफर करण्यात आला होता. तिने एका चॅट शोमध्ये सांगितले की, काही कारणांमुळे ती हा चित्रपट करू शकली नाही आणि त्यामुळे तिचेच नुकसान झाले.

5/5

राम लीला :

संजय लीला भन्साळी यांचा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. राम लीला हा चित्रपट प्रथम रणवीर सिंगला नाही तर रणबीर कपूरला ऑफर करण्यात आला होता. पण नंतर रणवीर सिंगने दीपिका पदुकोणसोबत हा चित्रपट केला आणि तो खूप हिट ठरला.