बॉलिवूडमधील 'या' 5 ब्लॉकबस्टर चित्रपटाचे फ्लॉप सीक्वेल, निर्माते आणि कलाकार झाले होते प्रचंड ट्रोल

बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आहेत ज्यांचे सीक्वेल देखील ब्लॉकबस्टर ठरले आहेत. परंतु, तुम्हाला माहिती आहे का 'या' 5 ब्लॉकबस्टर चित्रपटाचे सीक्वेल फ्लॉप ठरले. जाणून घ्या सविस्तर

| Dec 09, 2024, 16:34 PM IST
1/7

या चित्रपटांचे सीक्वेल फ्लॉप

बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांनी इतिहास रचला आहे. परंतु त्या चित्रपटांचे सीक्वेल बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच फ्लॉप ठरले. 

2/7

ट्रोल

यामध्ये निर्माते आणि कलाकारांना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते चित्रपट. 

3/7

बड़े मियां छोटे मियां

पहिला नंबर डेविड धवन यांच्या 'बडे मियां छोटे मियां' चित्रपटाचे नाव येतो. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, गोविंदा आणि रवीना टंडन यांनी काम केलं आहे. या चित्रपटाच्या सीक्वेलचे बजेट 290 कोटी इतके होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 90 कोटींची कमाई केली होती. 

4/7

लव आज कल

त्यानंतर प्रसिद्ध इम्तियाज अली यांच्या 'लव आज कल' चित्रपटाचे नाव येते. या चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण होते. हा चित्रपटाच्या सीक्वेलने चांगली कमाई केली होती. पण तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. 

5/7

वंस अपॉन ए टाइम इन मुंबई

'वंस अपॉन ए टाइम इन मुंबई' हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगन, इमरान हाशमी, कंगना रणौत आणि प्राची देसाई मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

6/7

सड़क

त्यानंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध डायरेक्टर महेश भट्ट यांचा 'सडक' चित्रपटाची. हा चित्रपट 1991 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे बजेट 2.70 कोटी इतके होते. त्याने 10.8 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या सीक्वेलचे बजेट 40 कोटी होते. तर या चित्रपटाने 5 लाखांची कमाई केली होती. 

7/7

वेलकम

पाचवा चित्रपट हा अनीस बज्मी यांचा 'वेलकम' आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, कतरिना कैफ, नाना पाटेकर, अनिल कपूर हे कलाकार होते. हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2015 मध्ये या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित झाला होता. ज्याचे बटेत 88 कोटी रुपये होते. या चित्रपटाने चांगली कमाई केली पण सीक्वेल फ्लॉप ठरला.