Health Tips : स्टूलसोबत रक्त येणे हे 6 आजारांचं लक्षण! लगेच डॉक्टरकडे जा

Blood In Stool : अनेकांना स्टूलमधून रक्तस्त्राव होतो. अशावेळी पहिलं मनात येतं आपल्याला मूळव्याधीचा (piles) त्रास तर नाही. पण स्टूलसोबत रक्त जाणं हे 6 आजारांचं लक्षण असून शकतं. त्यामुळे अशावेळी अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांकडे जावं. 

| Jul 10, 2024, 09:06 AM IST
1/8

बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याचा सवयी आणि ताण यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांनी आजकाल प्रत्येकाला गाठलंय. त्यात असंख्य लोकांना स्टूलमधून रक्तस्त्राव होतो. ही एक सर्वसामान्य समस्या नसून याकडे दुर्लक्ष करणे चुकीचं ठरु शकतं. 

2/8

तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला गदड लाल रंगाचा स्टूल येत असेल तर ही गंभीर समस्या असून हे अनेक आजारांचं लक्षण असू शकतं. स्टूलमधून रक्तस्त्राव होणे हे 6 आजारांचं लक्षण असू शकतं. 

3/8

स्टूलमधून रक्तस्त्राव होण्याचं सर्वात मोठं कारण हे मूळव्याध असू शकतं. मूळव्याधामुळे खाज, वेदना तर होतात शिवाय रक्तस्त्रावही होतो. त्यामुळे अशावेळी डॉक्टरांकडे जावं. 

4/8

दुसरं कारण लहान आतड्याच्या वरच्या भागात अल्सर (ulcer) झाल्यास स्टूलसोबत रक्तस्त्राव होतो. पाचक द्रवपदार्थाचे प्रमाण बिघडतं तेव्हा ही समस्या होते. ही समस्या Helicobacter pylori या जीवाणूच्या संसर्गामुळे होते. 

5/8

कोलन पॉलीप्स (Colon polyps) कोलन हे आतड्यांचे अस्तर असून ते आतड्यांच्या बाहेरील भागावर पसरतं. यामुळे स्टूलसोबत रक्तस्त्राव होतो. त्याशिवाय आतड्यांसंबंधी हालचाल झाल्यास तुम्हाला वेदना होतात. 

6/8

पचनसंस्थेच्या अस्तरात किंवा आतड्यांमध्ये जळजळ होत असेल तरीही स्टूलमधून रक्तस्त्राव होतो. त्यामुळे पोटदुखी, जुलाब, ताप, पोटदुखी अशा समस्यांना त्रासदायक ठरतात. 

7/8

मलविसर्जनाच्या मार्गात फोड आल्यामुळे ग्रंथीमध्ये मल जमा होतो. आतड्याच्या हालचाली दरम्यान ही समस्या होते. या फोडांमुळे मलप्रवाहात अडथळे येतात आणि स्टूलमधून रक्त येतं. 

8/8

गुदद्वाराच्या आसपासची त्वचा फाटल्यामुळे ही रक्तस्त्राव होतो. जर तुम्ही कठीण स्टूल पास करण्यासाठी जोर लावत असाल तर जास्त दाबामुळे त्वचा फाटते आणि स्टूलमध्ये रक्त येतं. जेव्हा फिशर असते तेव्हा आतड्यांसंबंधी हालचाल करताना जळजळ होतं. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)