Accident Black Spot : रस्त्यावर चालताना सावधान... ब्लॅकस्पॉट ठरतायेत जीवघेणे

Road potholes and Black Spot  : रस्त्यावर चालताना सावधान. कारण कोणता ब्लॅकस्पॉट तुम्हाला खड्ड्यात घालेल किंवा तुमचा जीव घेईल याचा नेम नाही. राज्यभरात महामार्गांवर 1 हजार 4 ब्लॅक स्पॉट आढळून आलेत. यापैकी राष्ट्रीय महामार्गांवर 610 ब्लॅक स्पॉट आहेत.

| Jun 10, 2023, 10:44 AM IST
1/7

रस्ता अपघातात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येते. मात्र, रस्त्यावरील खड्यांमुळे रस्ता अपघात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावर चालताना काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. कारण कारण कोणता ब्लॅकस्पॉट तुमच्या जीवावर ठरेल हे सांगता येत नाही.

2/7

ब्लॅकस्पॉट तुमचा जीव कधी घेईल याचा नेम नाही. राज्यभरात महामार्गांवर 1 हजार 4 ब्लॅक स्पॉट आढळून आले आहेत. यापैकी राष्ट्रीय महामार्गांवर 610 ब्लॅक स्पॉट आहेत.

3/7

मुंबईत 48 ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत. यात हाजीअली जंक्शन, चेंबूर नाका, दादरचं फूल मार्केट, सायन वांद्रे लिंक रोड, घाटकोपर-मानखूर्द लिंक रोड अशा ठिकाणांचा समावेश आहेत

4/7

ब्लॅक स्पॉट अपघाताच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाण मानले जाते. अशा ठिकाणाहून प्रवास करणे म्हणजे अपघात होण्यासारखे आहे. ही ठिकाणे इतकी धोकादायक असतात.

5/7

रस्त्याच्या विशिष्ट भागात वारंवार अपघात होत असल्यास किंवा तीन वर्षांत एकाच ठिकाणी पाच-दहा अपघात झाले, तर ती जागा ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केली जाते. यानंतर या ठिकाणचे तज्ज्ञ पथक अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर सूचना देऊन ही जागा सुरक्षित कशी करता येईल यावर भर देतात. 

6/7

अपघाताच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 5 लाखांहून अधिक रस्त्यावर अपघात होतात. ज्यामध्ये दीड लाख लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. तर 3 लाखांहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. 

7/7

त्यामुळे 2024 च्या अखेरीस अपघात आणि मृतांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्यावर भर आहे. रस्ते अपघातांबाबत राष्ट्रीय स्तरावर ब्लॅक स्पॉट्स ओळखून या स्पॉट्सपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.