ICC WTC Final च्या तारखेबाबत आली मोठी बातमी; 'या' मैदानावर रंगणार सामना

ICC World Test Championship : आयसीसीने टेस्ट क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप सुरू केली, तेव्हापासून या फॉरमॅटमध्ये उत्सुकता वाढलीये. आपल्या देशाच्या टीमने वनडे आणि टी-20 वर्ल्डकप जिंकावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. तशीच गोष्ट टेस्ट चॅम्पियनशिपबाबतही आहे. 

Dec 06, 2022, 22:56 PM IST
1/5

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची दुसरी वेळ असणार आहे. दरम्यान याच्या फायनलच्या तारखांबाबत मोठी बातमी समोर आलीये. 

2/5

एका वेबसाइटच्या अहवालानुसार, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. हा सामना इंग्लंडच्या ओव्हर मैदानात होऊ शकतो.

3/5

दरम्यान या सामन्यासाठी रिजर्व डे देखील ठेवण्यात आला आहे. मात्र आयसीसीने अजून याची औपचारिक घोषणा केलेली नाही.

4/5

नुकतंच इंग्लंड टीम आणि पाकिस्तान टीममध्ये झालेल्या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) 2023 मध्ये मोठी उलथा-पालथ झाली आहे. मुख्य म्हणजे याचा फायदा भारताला झाला आहे. 

5/5

चौथ्या नंबरवर असूनही टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याची दाट शक्यता मानली जातेय. यासाठी टीम इंडियाला आगामी 6 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. जर टीम इंडिया यामध्ये यशस्वी झाली तर पुन्हा एकदा टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात धडक देणार आहे.