Best Food Restaurant in Goa : 31 st ला गोव्यात जाताय? 'या' सर्वोत्तम हॉटेल्सना नक्की भेट द्या

Best Food Restaurant in Goa :  गोवा.... नुसतं नाव जरी घेतलं तरी कशी मनावर कुणीतरी हळुवार फुंकर घातल्यासारखी वाटते. कारण, हे ठिकाणच तसं आहे. प्रत्येकाला हवंहवंसं वाटणारं. 

Dec 27, 2022, 15:30 PM IST

Best Food Restaurant in Goa :  गोवा.... नुसतं नाव जरी घेतलं तरी कशी मनावर कुणीतरी हळुवार फुंकर घातल्यासारखी वाटते. कारण, हे ठिकाणच तसं आहे. प्रत्येकाला हवंहवंसं वाटणारं. आयुष्यात ज्यावेळी मला सारं जग फिरायचंय असं आपण म्हणतो, तेव्हा त्यांच्या या स्वप्नाची सुरुवात गोव्यातूनत होते असं म्हणायला हरकत नाही. एकाएकी गोव्याकडे लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे Year End. 2022 या वर्षाचा शेवट उत्साहातच करण्यासाठी असंख्य पर्यटकांचे पाय गोव्याकडे वळले आहेत. काहींनी तिथं जाण्याची तयारीही पूर्ण केली आहे. आता फक्त बॅगा उचलण्याची वाट पाहिली जातेय. तुम्हीही याच यादीतले एक आहात का? (new year 31 december party best food hotels in south north goa )

1/9

Best Food Restaurants and Party Places in Goa to Celebrate New Year 2023

गोव्यात जाऊन मजा, मस्ती, धमाल सर्वकाही नेहमीच करता. पण यावेळी एका वेगळ्याच गोव्याचं रुप तुम्ही अनुभवू शकता. हे रुप आहे, चवीष्ट गोव्याचं. अर्थात तिथल्या उत्तमोत्तम आणि निवडक खाद्यपदार्थांचं. 

2/9

Best Food Restaurants and Party Places in Goa to Celebrate New Year 2023

गिरीजा घर जेवोन (Girija Ghar Goa) - नाव वाचताना सूर थेट गोव्याचाच लागतोय ना? इथं आल्यावर तुम्ही इथलं जेवण जेवा आणि नंतरच पुढे काय म्हणायचं ते ठरवा. गिरीजा गायक नावाच्या काकू इथं मोठ्या प्रेमाणं आणखी काही गृहिणींच्या सोबतीनं घरगुती स्वरुपातील आणि गोव्याची अस्सल चव असणारं जेवण तयार करतात. कोळंबी, बांगडा, सुरमई अशी ताजी मासळी रवा लावून ज्या पद्धतीनं तळली जाते ती म्हणजे क्या बात. इथं तुम्हाला थाळीचा पर्याय उपलब्ध असतो. यामध्ये भात, तारली माशांचा ओल्या खोबऱ्याचं वाटण असणारा चवदार रस्सा, आवडीनुसार मासळी फ्राय, सोलकढी, कोशिंबीर आणि तोंडी लावायला एक भाजी असं ताट वाढलं जातं. 

3/9

Best Food Restaurants and Party Places in Goa to Celebrate New Year 2023

रस्सा इतका कमाल, की तुम्ही वाट्याच्या वाट्या फस्त कराल. बरं, किंमतही खिशाला परवडेल इतकी. काणकोण (Canacona, Goa) इथं असणाऱ्या मल्लिकार्जुन मंदिराच्या वाटेवरच गिरीजा घर जेवोन लागतं. दुपारी 12.30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत तुम्ही इथं येऊन मनसोक्त जेवू शकता.   

4/9

Best Food Restaurants and Party Places in Goa to Celebrate New Year 2023

केप गोवा (Cape Goa)- गोव्यातील Canaguinim इथं असणाऱ्या काबो दे रामा परिसरातच केप गोवा नावाचं एक सुरेख रेस्तराँ आहे. इथं राहण्याचीही उत्तम सोय आहे. तर, छानसा सूर्यास्त पाहत, कॉफीचा कप आणि आपल्या माणसांची साथ थोडक्यात पिक्चर परफेक्ट अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर केप गोवा उत्तम पर्याय. 

5/9

Best Food Restaurants and Party Places in Goa to Celebrate New Year 2023

इथं मिळणारे Wraps आणि सॅलड्स कमाल चवीचे. त्याची सांगता करण्यासाठी येणारी हॉट चॉकलेट ब्राऊनी त्यावर वितळणारं व्हॅनिला आईस्क्रीम पाहता क्षणी फस्त करण्यासाठी तुम्हीही घाई कराल. 

6/9

Best Food Restaurants and Party Places in Goa to Celebrate New Year 2023

द मिल (The Mill )- साऊथ गोवामध्ये असणाऱ्या पालोलेम (palolem) या टुमदार गावात बरेच कॅफे आहेत जिथं तुम्ही भूक आणि जीभेचे चोचले भागवू शकता. त्यातही काहीतरी ऑफबिट खायचं असेल तर द मिल हा एक उत्तम पर्याय. इथं मिळणारा व्हिक्टोरिया स्पाँज तुम्हाला एक वेगळाच अनुभव देतो. तर, ब्रेकफास्टसाठी इथं कमाल पर्याय आहेत. अंड्यांच्या विविध आणि तितक्याच चवीष्ट प्रकारांपासून मल्टीग्रेन आणि Home Baked Breads पर्यंत बरेच पदार्थ तुम्ही इथं खाऊ शकता. इथे मिळणारी स्पॅनिश कॉफी Must Try

7/9

Best Food Restaurants and Party Places in Goa to Celebrate New Year 2023

द्रोपदी (Dropadi) - पालोलेमच्या समुद्रकिनाऱ्याला लागूनच असणारं आणि अनेक खवैय्यांच्या बकेट लिस्टमध्ये असणारं ठिकाण म्हणजे हॉटेल द्रोपदी. इथं मिळणारे फिश अँड चिप्स केव्हाही खावेत इतके सुरेख. गोवन प्रॉन्स करी, वाफाळलेला भात आणि सोबत थंडगार सागरी वारा आणि काय हवं... द्रोपदीमध्ये तुम्ही 'फ्रेश कॅच' अर्थात त्या दिवशी पकडल्या गेलेल्या मासळीतूनही तुम्ही तुम्हाला हवा तो मासा, खेकडा निवडू शकता. 

8/9

Best Food Restaurants and Party Places in Goa to Celebrate New Year 2023

द फिशरमन्स वॉर्फ (The Fisherman's Wharf) - मासे आणि त्यांचं विश्व किती सुंदर आणि चवीष्टसुद्धा असू शकतं हे इथं येऊन तुमच्या लक्षात येईल. गोव्यातील पणजी (Panjim) येथे असणाऱ्या या हॉटेलला तुमच्या गोवा भेटीदरम्यान नक्की जा. इथं मिळणारे लॉब्स्टर, स्क्विड फ्राय आणि इतर बरेच पदार्थ किमान एकदातरी खा. (छाया सौजन्य- फेसबुक / The Fisherman's Wharf )

9/9

Best Food Restaurants and Party Places in Goa to Celebrate New Year 2023

आनंद - गोव्यातील Chivar अंजुना येथे असणारं आनंद हेसुद्धा घरगुती जेवणाची चव देणारं आणखी एक ठिकाण. कोळंबी फ्रायपासून इथल्या सोलकढीपर्यंत प्रत्येक पदार्थाची चव तुमच्या जीभेवर रेंगाळत राहील यात शंका नाही. याव्यतिरिक्त गोव्यात फॅट फिश, मार्टीन्स कॉर्नर, कोकणी कॅन्टीन, बोमरास हे आणि असेही अनेक हॉटेल्स तुमच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी सज्ज आहेत. (छाया सौजन्य- झोमॅटो) (प्रत्येक हॉटेलचा अचूक रस्ता Google Map च्या मदतीनं तुम्ही शोधू शकता. )