PHOTO: उशिरा लग्न करण्याचे फायदे कोणते? तुम्हीही म्हणाल 'व्हय लका खरंय'

Benefits of late marriage : सध्या लग्नाची जोरदार क्रेझ पहायला मिळत आहे. एक विशिष्ठ टप्पा ओलांडल्यानंतर तरुणाईवर लग्नाचा दबाव वाढतो. आधी घरच्यांकडून आणि नंतर समाजाकडून दबाव वाढत जातो. मात्र उशिरा लग्न करण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?

| Jun 14, 2024, 16:41 PM IST
1/7

आर्थिकदृष्ट्या सबळ

आजकाल तरूणाई आर्थिकदृष्ट्या सबळ झाल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय घेते. वर्षागणिक तुम्ही नीट प्लॅनिंग केले तर आर्थिकदृष्ट्या स्टेबल राहू शकता. 

2/7

समजुतदारपणा

स्वतः पैसे कमवायला लागले की ते कशावर उधळायचे याबाबतचा समजुतदारपणा येण्यास वेळ लागतो. त्यामुळे अनेकजण उशिरा लग्न करतात. 

3/7

मॅच्युरिलीटी लेव्हल

काहींना वयानुसार नव्हे तर बदलत्या वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार मॅच्युरिटी लेव्हल, समजुतदारपणा वाढीस लागतो. 

4/7

मानसिक ताण

मॅच्युरिटी लेव्हल दोघांमध्ये चांगली असली की भविष्याबाबतचे निर्णय घेणं अधिक सुकर होतात. यामुळे मानसिक ताण देखील कमी होता.

5/7

स्वतःला ओळखण्याची संधी

उशिरा लग्न करण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे स्वतःलाच ओळण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. समोरच्याकडून काय अपेक्षा आहेत? याबाबत पुरेशी कल्पना असते. 

6/7

वयानुसार विचारांमध्ये बदल

जसजसा काळ बदलत जात जातो तसे प्रत्येकाच्या विचारांमध्ये बदल होतात. कदाचित एखाद्या गोष्टीकडे वयाच्या 20 व्या वर्षी पाहण्याचा दृष्टीकोन हा 40 व्या वर्षी वेगळा असू शकतो. 

7/7

स्वप्नांना पुरेसा वेळ

उशीरा लग्न केल्याने हा स्वप्नांचा वेध यशस्वीपणे सत्यात उतरवण्यासाठी तुम्ही स्वतःलाही पुरेसा वेळ देऊ शकता. अनेकदा लग्न झाल्यानंतर 'तडजोडी' करणं भाग पडत आणि स्वप्न मागे पडतात.