'अशा' पद्धतीने फणस खाल्ला तर होतील 'हे' चमत्कारिक फायदे

चवीला गोड असलेला हा फणस शरीरासाठी सुद्धा तितकाच फायदेशीर आहे. 

Jul 02, 2024, 20:00 PM IST

'वरुन काटेरी' आणि आतून 'गोड रसाळ' गरे ही फणसाची खासियत आहे. 

1/8

आंबापोळी प्रमाणेच फणसपोळी देखील तितकीच चवीने खाल्ली जाते. 

2/8

फणसामध्ये विटामिन ए, सी, थायमिन, पोटेशियम, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, आयर्न आणि झिंकची मात्रा मुबलक प्रमाणात असते. 

3/8

अनेकांना सकाळी उठल्यावर चहा आणि कॉफी पिण्याची सवय असते. रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफीच्या सेवनाने शरीरावर गंभीर परिणाम होतात.   

4/8

सकाळी उठल्यावर फळांचं सेवन केल्याने फक्त रोगप्रतिकारक शक्तीच नाही तर त्वचेचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

5/8

रोज सकाळी एक कप दुधात फणसाचे गरे, वेलची, ड्राय फ्रुट्स आणि चवीपुरती साखर टाकून याचा मिल्कशेक बनवून प्या. नाश्त्याला फणसाचा मिल्कशेक प्यायल्याने डोळ्यांचं आरोग्य सुधारते. 

6/8

सांधेदुखीचा त्रास होत असल्यास सिझनमध्ये फणसाचे गरे किंवा ज्यूसचं सेवन केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. 

7/8

फणसामध्ये अँटीऑक्सि़डंट्स प्रमाण जास्त असतात, त्यामुळे हृदय विकाराच्या रुग्णांसाठी फणसाचे गरे आरोग्यदायी ठरतात.   

8/8

रक्ताच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबीन कमी असणं किंवा थॅलेसेमिया सारखे आजार बळावतात. फणसाच्या सेवनाने रक्तातील लोह वाढण्यास मदत होते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)