बागी २: ट्रेलर लॉन्चपूर्वी टायगर-दिशा ने केली ग्रँड एन्ट्री

Feb 21, 2018, 14:59 PM IST
1/6

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी बुधवारी आपल्या अॅक्शन थ्रिलर 'बागी - २' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करणार आहेत. या लॉन्चिंगपूर्वी दोघांनीही महालक्ष्मी रेसकोर्सवर हेलिकॉप्टरने ग्रँड एन्ट्री केली.

2/6

यावेळी दोघांच्याही चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. टायगर आणि दिशा दोघांचीही एक झलक पाहण्यासाठी तरुणाई जमली होती.

3/6

या सिनेमात अॅक्शनचा भडीमार असून सिनेमातील एक दृश्य हेलिकॉप्टरमध्ये शूट करण्यात आलं आहे. त्यामुळेच सिनेमातील या जोडीने ऑनस्क्रिन स्टंटला रिअल लाईफमध्ये करण्यास तयारी केली आहे.

4/6

या सिनेमाचा ट्रेलर दुपारच्या सुमारास रिलीज केला जाणार आहे. 

5/6

ट्रेलर रिलीज करण्यापूर्वी या सिनेमाचे दोन पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. एका पोस्टरमध्ये टायगर एकटा दिसत आहे.

6/6

तर, दुसऱ्या पोस्टरमध्ये टायगर दिशासोबत दिसत आहे. टायगर दिशाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं या पोस्टरमध्ये दिसत आहे. हा सिनेमा ३० मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: @NGEMovies/ Twitter)