रिंकू सिंगचं रातोरात नशिब चमकलं! एकही मॅच न खेळता मिळाले 'इतके' कोटी

BCCI Prize Money Distribution : टीम इंडिया नवा फिनिशर रिंकू सिंग याला आयपीएलमध्ये 55 कोटींची बोली लावण्यात आली होती. मात्र, रिंकूला आता एकही सामना न खेळता कोटींमध्ये पैसे मिळणार आहेत.

| Jul 08, 2024, 22:47 PM IST
1/5

20 कोटी

टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलनंतर आयसीसीकडून साऊथ अफ्रिकेला 10 कोटी दिले, तर टीम इंडियाला 20 कोटी मिळाले होते.

2/5

125 कोटी

बीसीसीआयने टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचं बक्षिस म्हणून 125 कोटी जाहीर केले होते.

3/5

प्रत्येकी 1 कोटी रुपये

मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयकडून मिळालेल्या रकमेच्या वितरणात राखीव खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

4/5

राखीव खेळाडू

राखीव खेळाडू म्हणून रिंकू सिंग, शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता.

5/5

15 खेळाडूंना किती?

दरम्यान, टीम इंडियामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.