बांगलादेशचे सर्वात श्रीमंत उद्योगपती शेख हसीना यांच्यापेक्षा 40000 पट श्रीमंत, पण मुकेश अंबांनींसमोर...

Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अराजकता माजली आहे. आरक्षणाच्या नावाखाली बांगलादेशात हिंसा सुरु असून आतापर्यंत जवळपास 400 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बिघडलेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं. 

| Aug 08, 2024, 18:51 PM IST
1/7

बांगलादेशचे सर्वात श्रीमंत उद्योगपती शेख हसीना यांच्यापेक्षा 40000 पट श्रीमंत, पण मुकेश अंबांनींसमोर...

2/7

 बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अराजकता माजली आहे. आरक्षणाच्या नावाखाली बांगलादेशात हिंसा सुरु सत्तापालट होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आरक्षणाच्या नावावखाली देशात ठिकठिकाणी हिंसाचार सुरु आहे. बिघडलेल्या परिस्थितीमुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं. 

3/7

बांगलादेशमधल्या हिंसाचारामुळे देशाची आर्थिस परिस्थिती ढासळली आहे. गरीबी आणि बेरोजगारीमुळे देश ढबघाईला आलाय. पण असं असलं तरी आजही देशात काही उद्योगपती अरबपती आहे. हे उद्योगपती रोज करोडो रुपयांची कमाई करतात. बांगलादेशमधल्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीचं नाव आहे मूसा बिन शमशेर. त्यांना बांगलादेशचे 'अंबानी' असंही म्हटलं जातं.  

4/7

बांगलादेशचे श्रीमंत उद्योगपती मूसा बिन शमशेर हे रिक्यूपमेंट फॉर्म DATCO ग्रुपचे फाऊंडर आहे. त्यांची कंपनी आंतरराष्ट्रीय शस्त्रांची डिल करते. बांगलादेशमधल्या अरबपतींमध्ये मूसा बिन शमशेर हे सर्वात अव्वल स्थानावर आहेत. प्रिन्स मूसा या नावानेही ते ओळखले जातात.

5/7

मूसा बिन शमशेर यांची एकूण संपत्ती 12 अरब डॉलर इतकी आहे. संपत्तीच्या बाबतीत प्रिन्स मूसा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यापेक्षा 40 हजार पट जास्त श्रीमंत आहेत. शेख हसीना यांच्याकडे केवळ 2.48 कोटी संपत्ती आहे. प्रिन्स मूसा यांच्या शिवाय सलमान एफ रहमान सुद्धा बांगलादेशमधले दुसऱ्या क्रमांकाचे अरबपती आहे. एफ रहमान हे बेक्सिमको ग्रुपचे अध्यक्ष आहेत.   

6/7

शेख हसीना यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय यांचा मुलगा अमेरिकेत उद्योगपती आहे. आईसीटी कंपनी सिनेप्सचे ते अध्यक्ष आहेत. रिपोर्टनुसार त्यांची संपत्ती 1.5 बिलिअन डॉलर म्हणजे जवळपास 12,450 कोटी रुपये इतकी आहे. 

7/7

बांगलादेशचे अंबानी अशी ओळख असलेले प्रिन्स मुसा यांची संतपत्ती भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या संपत्तीसमोर मात्र खूपच कमी आहे. फोर्ब्स बिलेनिअर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानी यांचं नेटवर्थ 112.2 अरब डॉलर आहे. तर मूसा बिन शमशेर यांची संपत्ती केवळ 12 अरब डॉलर इतकी आहे.