3 सेकंदात 100 Kmh, Top Speed 250 Kmh अन्...; 1000 CC इंजिनची दमदार स्पोर्ट्स बाईक; किंमत फक्त...

Powerhouse 1000 CC Bike In Market : नवीन वर्षामध्ये तुम्ही नवीन स्पोर्ट्स बाईकचा विचार करत असाल तर एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. डिझाइन, सुरक्षा आणि एकंदरित सर्वच गोष्टींमध्ये परवडणाऱ्या किंमतीत उत्तम मॉडेल शोधत असाल तर तुमचा शोध तुम्ही या बाईकवर थांबवू शकतात. जाणून घ्या या नव्या बाईकचे स्पेसिफिकेशन, फिचर्स अन् किंमत...

Dec 28, 2023, 13:55 PM IST
1/8

Bajaj Unveils the Powerhouse Pulsar 1000F price features and specifications

भारतीय दुचाकी बाजारपेठेतील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज कंपनीने आपली नवीन दुचाकी बाजारात उतरवली आहे. बजाज पल्सर 1000 एफ असं या दुचाकीचं नाव आहे.

2/8

Bajaj Unveils the Powerhouse Pulsar 1000F price features and specifications

भारतीय स्पोर्ट्स बाईकच्या बाजारपेठेतील ही सर्वात स्वस्त बाईकपैकी एक आहे. या बाईकचं इंजिन, डिझाइन आणि परपॉरमन्स खरोखरच उत्तम आहे. ही बाईक 2024 साली भारतीय स्पोर्ट्स बाईकप्रेमांनी नक्कीच भुरळ घालेल यात शंका नाही.

3/8

Bajaj Unveils the Powerhouse Pulsar 1000F price features and specifications

पल्सर 1000 एफचं डिझाइन हे फारच स्फोर्टी आहे. मसल फ्युएल टँक, स्पीट हेडलॅम्स, क्लिप ऑन हॅण्डलबार्स आणि स्प्लिट सीट अशी बाईकची रचना आहे. या बाईकला मोठ्या आकाराची विंड स्क्रीन देण्यात आली आहे. ही बाईक काळ्या, लाल, निळ्या आणि पांढऱ्या अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.

4/8

Bajaj Unveils the Powerhouse Pulsar 1000F price features and specifications

या बाईकचं इंजिन हे नावाप्रमाणे 1000 सीसीचं आहे. हे लिक्वीड कूल्ड इंजिन असून 138 बीएचपी पॉवर आणि 102 एनएम टॉर्क निर्माण करतं. इंजिन 6 गेअरचं असून एल्केलेशन फारच उत्तम आहे. 3 सेकंदामध्ये बाईक 100 किलोमीटर प्रति तास वेग पकडून शकते. गाडीचा टॉप स्पीड 250 किलोमीटर प्रति तास इतका आहे.

5/8

Bajaj Unveils the Powerhouse Pulsar 1000F price features and specifications

पल्सर 1000 एफमध्ये लेटीस्कोपीक फ्रंट व्हील आणि मोनो शॉक रेअर स्पेन्शन देण्यात आलं आहे. वेड्यावाकड्या वळणांवर आणि खरबडीत रस्त्यांवर रायडिंगसाठी हे फायद्याचं ठरु शकतं. या बाईकमध्ये फ्रण्ट व्हीलला 300 एमएम डीस्क ब्रेक आहे. तर मागच्या चाकाला 240 एमएमचा डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

6/8

Bajaj Unveils the Powerhouse Pulsar 1000F price features and specifications

बाईकमध्ये एबीएस, फ्लुअल इजेक्शन, डिजीटल इन्स्टूमेंट क्लस्टर आणि ट्रीप मीटरसारख्या गोष्टींमुळे रायडिंग अधिक सुरक्षित होणार आहे. तसेच पॉवरफूल इंजिन, उत्तम गेअर बॉक्समुळे हे मॉडेल बाईकप्रेमींना नक्कीच भुरळ घालेल यात शंका नाही. 

7/8

Bajaj Unveils the Powerhouse Pulsar 1000F price features and specifications

या बाईकची किंमत ही स्पोर्ट्स बाईकचा विचार केल्यास परवडणारी आहे. ही बाईक 1.68 लाख (एक्स शो-रुम प्राइज) रुपयांना उपलब्ध आहे. या बाईकबद्दल एक चिंतेची बाब म्हणजे बाईकचं एव्हरेज 18 ते 20 किलोमीटर प्रति लीटर इतकं आहे.

8/8

Bajaj Unveils the Powerhouse Pulsar 1000F price features and specifications

बाईकला स्पोर्टी लूक देताना केलेल्या रचनेमुळे चालकाच्या मागील बाजूस बसलेल्या व्यक्तीसाठी दिर्घकाळ मागे बसून प्रवास करणं अवघडल्यासारखं होऊ शकतं. एकट्याला भटकंती करण्यासाठी ही बाईक उत्तम असली तरी जोडीदाराबरोबर फिरण्याचा विचार करायचा असेल तर मागे बसलेल्या व्यक्तीला नक्कीच त्रास होण्याची शक्यता आहे.