PHOTO : 'हा' खलनायक घटस्फोट आणि 4 वर्ष मोठ्या मराठी अभिनेत्रीच्या पडला प्रेमात, प्रपोज करायला लागली 3 वर्षे

Entertainment : 'दुष्मन', 'धडक', 'संघर्ष' आणि 'मुल्क' यांसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून आपला ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. आपल्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात तो पडला तेव्हा सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करत होता. 

Nov 10, 2024, 10:50 AM IST
1/8

या फोटोमधील मुलगा आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक आहे. आज त्याचा 56 वर्षांचा वाढदिवस असून त्यांनी चित्रपटांमध्ये जवळपास सर्वच प्रकारची व्यक्तिरेखा साकारली पण खलनायक बनून त्यांनी बरीच ओळख मिळवली. मोठ्या पडद्यावर तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला असेल, पण खऱ्या आयुष्यात तो अतिशय सभ्य आहे. आम्ही बोलत आहोत आशुतोष राणा यांच्याबद्दल.   

2/8

वाढदिवसनिमित्त आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांच्या प्रेम कहाणीबद्दल जाणून घेऊयात. आशुतोष आणि रेणुका यांची पहिली भेट हंसल मेहताच्या चित्रपटाच्या प्रिव्ह्यूदरम्यान झाली होती. जरी तो चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. पण दोघांची मैत्री झाली. आशुतोष त्याच्या मित्रांसोबत प्रिव्ह्यू बघायला गेला होता आणि त्यातला एक रेणुकाचा मित्र निघाला. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत रेणुकाने सांगितले की, दोघांच्या आवडीनिवडी समान असल्यामुळे ते एकमेकांकडे आकर्षित झाले होते. 

3/8

आशुतोषने दिग्दर्शक रवी राय यांच्याकडे अभिनेत्रीचा नंबर मागितला. त्याने नंबर दिला पण रात्री 9 नंतर फोन करू नकोस आणि आन्सरिंग मशीनवर मेसेज टाकण्यास सांगितले. आशुतोषने आन्सरिंग मशिनवर 'दसऱ्या'च्या शुभेच्छा देण्यासाठी एक मेसेज टाकला.

4/8

आशुतोष राणाला खात्री होती की ती त्याच्याशी संपर्क करण्याचा काहीतरी मार्ग शोधेल. असेच काहीसे घडले, रेणुकाने त्याच्या मेसेजला रिप्लाय देऊन बहिणीचा मेसेज केला आणि तिचा फोन नंबरही दिला, ज्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली.

5/8

द लॅलनटॉपला दिलेल्या मुलाखतीत आशुतोष राणा यांनी खुलासा केला होता की, त्याने रेणुकाला रात्री 10 वाजता तिच्या नंबरवर कॉल केला होता. त्यानंतर 1.5 तास चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी, त्याने तिला रात्री 11 वाजता फोन केला आणि ते तासनतास बोलत राहिले.

6/8

कॉल्सद्वारे त्यांची मैत्री फुलली आणि येत्या काही महिन्यांत ते दिवसातून तीन वेळा बोलू लागले. आशुतोष सुरुवातीला रेणुकाला प्रपोज करण्यास कचरत होता. रेणुकाला अशा भावना नसतील तर मैत्री तुटू शकते असे त्याला वाटत होते.

7/8

आशुतोष राणा यांनी धाडस दाखवले. प्रपोज करण्यासाठी कविता लिहिली. रेणुकाला ते सांगताना त्याने तिला प्रपोज केले. रेणुकानेही त्यांचा प्रस्ताव मान्य केला. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले. आशुतोष मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातला होता, तर रेणुका मुंबईची होती.

8/8

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे या दोघांचे संस्कार आणि संस्कृती वेगळी होती. रेणुका यांच्या घरच्यांचा विरोध होता. आशुतोषचा मोठा परिवार होता. रेणुकाला ऍडजस्टमेंटची समस्या होती. त्यानंतर दोघांनी 2001 मध्ये लग्न केले. त्यांचा विवाह एक भव्य सोहळा होता, ज्यात सुमारे दीड लाख लोक उपस्थित होते. या जोडप्याला शौर्यमान आणि सत्येंद्र ही दोन मुले आहेत.