Shiv Jayanti 2023 : फळापासून पानापर्यंत, तांदळापासून तिळाच्या दाण्यापर्यंत; छत्रपती शिवाजी महाराजांची अनोखी मानवंदना

कलाकारांनी थक्क करणाऱ्या कलाकृती साकारल्या आहेत. या कलाकृतींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांना अभिवादन करण्यात आले आहे.

Feb 19, 2023, 20:24 PM IST

Shiv Jayanti 2023 celebration : राज्यभरात शिवजंयतीचा (Shiv Jayanti 2023) उत्सव जल्लोषता साजरा करण्यात येत आहे.  फळापासून पानापर्यंत, तांदळापासून तिळाच्या दाण्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोखी मानवंदना देण्यात आली आहे. हे अनोखे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

1/9

एका तरुणाने शिवरायांची प्रतिमा असलेला हेअर कट केला आहे. 

2/9

ही सूक्ष्म कलाकृती साकारण्यासाठी त्याने भिंगांचा वापर केला नाही हे विशेष.

3/9

अभिषेकने अनेक महापुरुषांची चित्रे आपट्याचे पान, पिंपळाचे पान, सुपारी, खडू, पेन्सिल लीड, तीळ आणि मोहरी वर सुबक पद्धतीने साकारले आहे. यावेळी पाच दिवस सराव केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र त्याने तीळ दाण्यावर 3 तासात साकारले.

4/9

यवतमाळच्या पुसद येथील अभिषेक रुद्रवार या युवा कलावंताने तिळाच्या दाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले. 

5/9

तिळाच्या दाण्यावर साकारले शिवराय.

6/9

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपळाच्या पानावर छत्रपतींचं आकर्षक चित्र साकारण्यात आलंय. कणकवली येथील युवा चित्रकार पूजा कदम हिने रंगाच्या साहाय्याने पिंपळाच्या पानाच्या जाळीवर हे मनमोहक चित्र साकारले आहे. 

7/9

शिव जयंती निमित्ताने वाशिमच्या बाकलीवाल ज्युनिअर कॉलेजच्या अभिषेक आत्माराम जाधव या विद्यार्थ्यांने टरबुजाच्या फळात छत्रपती शिवरायांची आकर्षक प्रतिमा कोरून त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे.  

8/9

अमानापुर येथील भारती विद्यापीठाच्या अभिजीत कदम प्रशाला ज्युनिअर कॉलेजचे कलाशिक्षक नरेश लोहार आणीन विद्यार्थ्यांनी शिवरायांना अनोखे अभिवादन केले आहे. १७ बाय २५ फुट या साइजमधे ही प्रतिकृती अवघ्या दोन दिवस आणि एकोणीस तासात पूर्ण केली आहे.

9/9

सांगली जिल्ह्यात 54 लाख तांदळाच्या दाण्यापासून साकारली शिवरायांची भव्य दिव्य प्रतिकृती.