Clothes Art: नजर असेल तर भन्नाट काहीतरी दिसेल! तारेवर वाळत घातलेल्या या कपड्यांची सोशल मीडियावर चर्चा

Art Using Clothes On Washing Line: सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. हल्लीच्या आर्टीफिशीएल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये डिजीटल आर्टवर्कचं नवीन दालन कलाकारांसाठी आणि रसिकांसाठीही खुलं झालं आहे. सोशल मीडियावर तर अनेक अकाऊंट्सवरुन असे आर्टवर्क शेअर केले जातात. सध्या अशाच एका आर्टवर्कची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर आहे. दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांमधून वेगवेगळे प्राणी हेलगा स्टेटझेल या कलाकाराने साकारले आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही या कलाकाराच्या कौशल्याला नक्कीच दाद द्याल आणि थक्क व्हाल! पाहूयात व्हायरल झालेलं हे हटके आर्टवर्क...

| May 21, 2023, 14:57 PM IST
1/12

Art Using Clothes On Washing Line

दोन फूल स्लीव्हची शर्ट वापरुन तयार करण्यात आलेली ही आकृती हत्तीची आहे. तारेवर वाळत घातलेल्या कपड्यांमधून अशा अनेक भन्नाट कलाकृती हेलगा स्टेटझेल यांनी तयार केल्यात. ब्रिटनमधील या कलाकाराने आपल्या @helga.stentzel या इन्स्ताग्राम हॅण्डलवरुन हे फोटो शेअर केले आहेत. (सर्व फोटो - instagram/helga.stentzel वरुन साभार)

2/12

Art Using Clothes On Washing Line

तारेवरची कसरत करणारी मांजर या फोटोत सहज दिसून येते की नाही?

3/12

Art Using Clothes On Washing Line

भिंतीला पडलेलं भगदाड त्यामागे असलेली खिडकी अन् भगदाड पडलेल्या भिंतीजवळ वाळत घातलेल्या कपड्यांमुळे या फोटोमध्ये एका चेहऱ्याची आकृती तयार झाली आहे. मागील खिडकीत वाळत घातलेले दोन पांढरे कपडे या चेहऱ्याचे दोन दात असल्यासारखं वाटत आहे.

4/12

Art Using Clothes On Washing Line

शर्ट, पॅण्ट आणि रुमाल वापरुन बनवलेला हा प्राणी गाढव असल्यासारखं वाटतंय की नाही?

5/12

Art Using Clothes On Washing Line

लेडीज अंडरपॅण्ट्स आणि शर्टांचा वापर करुन बनवलेले हे प्राणी कोणते ओळखलं का? या आहेत समोरासमोर उभ्या असलेल्या दोन मेंढ्या! दिसल्या का?

6/12

Art Using Clothes On Washing Line

काळ्या पांढऱ्या चट्ट्यापट्ट्या असलेलेल शर्ट आणि पॅण्ट्स वापरुन तयार करण्यात आलेला हा झेब्रा कसा वाटला?

7/12

Art Using Clothes On Washing Line

मोजे आणि कपडे वापरुन बनवलेल्या या आकृतीत तुम्हाला कोणता प्राणी दिसतोय? नाही ओळखता आलं का? आहो हा डायनोसॉर आहे.

8/12

Art Using Clothes On Washing Line

थंडीत वापरली जाणारी कानटोपी आणि स्वेटरच्या मदतीने तयार केलेलं हे बर्फाळ प्रदेशामधील अस्वल तुम्हाला कसं वाटलं?

9/12

Art Using Clothes On Washing Line

दोन पॅण्टचा वापर करुन तयार केलेली ही आकृती वाळंवटात फिरणारा उंट असल्याचा भास निर्माण करत आहे.

10/12

Art Using Clothes On Washing Line

या वाळत घातलेल्या कपड्यांमध्ये तुम्हाला एखादी गाय दिसतेय का?

11/12

Art Using Clothes On Washing Line

भिंतीवरील खिडक्यांखाली वाळत घातलेल्या या कपड्यांमुळे हसणारा चेहरा भिंतीवर निर्माण झाल्याचा भास होतोय.

12/12

Art Using Clothes On Washing Line

पांढऱ्या रंगाचं हूड वापरुन उडाणाऱ्या चिमणीसारखा हा आकारही खरोखर लक्ष वेधून घेत आहे.