श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच शूटिंग सोडून घरी परतला अर्जुन

Feb 25, 2018, 20:35 PM IST
1/6

Arjun Kapoor

Arjun Kapoor

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाने सर्वांनाच एक धक्का बसला आहे. शनिवारी रात्री दुबईत कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांचं निधन झालं. श्रीदेवी यांचे कुटुंबीय बाहेर असल्याने सर्वजण अभिनेता अनिल कपूर यांच्या घरी दाखल होत आहेत.

2/6

Arjun Kapoor

Arjun Kapoor

अभिनेता अर्जुन कपूर अमृतसरमध्ये 'नमस्ते इंग्लंड' सिनेमाचं शूटिंग करत होता. मात्र, श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच तो तात्काळ मुंबईत परतला.

3/6

Arjun Kapoor

Arjun Kapoor

मुंबई विमानतळावरुन अभिनेता अर्जुन कपूर थेट आपले काका अनिल कपूर यांच्या घरी पोहोचला. 

4/6

Arjun Kapoor

Arjun Kapoor

आपली आवडती आणि प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाची बातमी बॉलिवूडसह चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवी यांच्या घराबाहेर चाहत्यांनी गर्दी केली आहे.

5/6

karan

karan

श्रीदेवी यांच्या मृत्यूची बातमी समजताच करण जोहर जान्हवीच्या घरी पोहचला. त्यानंतर जान्हवीला काका अनिल कपूरच्या घरी नेलं. 'धडक' या सिनेमातून करण जोहर अभिनेत्री जान्हवी कपूरला बॉलिवूडमध्ये लॉन्च करत आहे.

6/6

Sridevi

Sridevi

१९६३ मध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांनी १९६७ साली एक बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. श्रीदेवीने हिंदीसोबतच तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम सिनेमांतही काम केलं आहे. श्रीदेवीला २०१३ साली सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले. (सर्व फोटो सौजन्य: बॉलिवूडलाइफ डॉट कॉम)