किडनीचा त्रास होतोय ? डाएटमध्ये आजच 'या' भाज्यांचा करा समावेश

किडनी त्रास वारंवार होत असल्यास शरीरात पाणी कमरता निर्माण झाल्याची ही लक्षणं आहेत. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रामाण वाढवण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश करावा असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.   

Jul 27, 2024, 16:27 PM IST
1/7

पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात पाणी कमी प्यायलं जातं, त्यामुळे किडनीशी संबंधित आजार होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच भरपूर पाणी पिणं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेली फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा असं डॉक्टर सांगतात.

2/7

क्रॅनबेरी

क्रॅनबेरीमध्ये अँटीऑक्सीडेंट्स आणि व्हिटामीन सी मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे क्रॅनबेरीचं सेवन करणं आरोग्यदायी मानलं जातं.  अँkटीबॅक्टीरियल गुणधर्म आढळतात. जर तुम्हाला लघवी करताना जळजळत असेल तर क्रॅनबेरी खाणं फायदेशीर ठरतं.  

3/7

मासे

माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड जास्त असतात. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर मासे खाण्याने नियंत्रणात येतो.  रक्तदाब नियंत्रणात राहिल्याने किडनीचे विकार होत नाही. त्यामुळे आहारात माश्यांचं सेवन करावं.   

4/7

सफरचंद

सफरचंदाला बहुगुणी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. हिमोग्लोबीन वाढवण्यासोबतच सफरचंद किडनीच्या आजारावर देखील गुणकारी आहे. सफरचंदमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे लघवी साफ होते.

5/7

कोबी

कोबीमध्ये पोटॅशिअम जास्त असतं. त्याशिवाय व्हिटामीन के आणि सी जास्त असतं. कोबीच्या पाणी जास्त असतं कोबी खाल्याने किडनी डिटॉक्सीफाय होण्यास मदत होते. म्हणून किडनी आजार असल्यावर डॉक्टर कोबी खाण्याचा सल्ला देतात.   

6/7

लसूण

लसूनची चव आणि वास अनेकांना आवडत नाही. मात्र जर तुम्हाला किडनीचा आजार असेल तर तुम्हाल लसूण खाणं फायदेशीर ठरु शकतं.

7/7

तुम्ही भाज्या आणि सूपमधून देखील लसूण खाऊ शकता. लसूणमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. त्यामुळे किडनीवर त्याचा गंभीर परिणाम होत नाही.                                                                                                                                                                                        (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)