IPL ऑक्शनमध्ये 'या' 5 खेळाडूंसाठी होणार तगडी 'फाईट', 20 कोटींहून लागू शकते जास्त बोली

IPL Auction 2025 : आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनच आयोजन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 24 किंवा 25 नोव्हेंबर रोजी हे ऑक्शन होऊ शकतं. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएल फ्रेंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रेंचायझींनी रिटेन केललं नाही. तर काही खेळाडूंना फ्रेंचायझींनी रिटेन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आज आपण अशा 5 खेळाडूंविषयी जाणून घेऊयात ज्यांच्यावर आयपीएल ऑक्शनमध्ये 20 कोटींहून अधिकची बोली लागी शकते.   

| Nov 07, 2024, 17:45 PM IST
1/5

ऋषभ पंत :

ऋषभ पंत 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सशी जोडला गेला, त्यानंतर त्याच्यावर कॅप्टन पदाची जबाबदारी सुद्धा सोपवण्यात आली. मात्र यंदा दिल्ली फ्रेंचायझीने त्याला रिटेन केलेलं नाही. 27 वर्षांचा ऋषभ पंत हा भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज आहे. त्यामुळे पंतवर मेगा ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लागू शकते. तसेच विकेटकिपर फलंदाज सह पंतला आयपीएलमध्ये कॅप्टनपदाचा सुद्धा अनुभव आहे. त्यामुळे चेन्नई, आरसीबी इत्यादी प्रसिद्ध टीम सुद्धा त्याला आपल्या संघात घेण्यास इच्छुक असतील. 

2/5

अर्शदीप सिंह :

 अर्शदीप सिंह हा सध्या टी 20 फॉरमॅटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. तो नव्या बॉलसह डेथ ओव्हरमध्ये चांगले प्रदर्शन करण्यास सक्षम आहे. अर्शदीप टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता, त्यामुळे आयपीएल 2025 साठीच्या मेगा ऑक्शनमध्ये अनेकांची नजर त्यांच्यावर असेल. 

3/5

केएल राहुल :

आयपीएल 2022 ते 2024 पर्यंत केएल राहुल हा लखनऊ सुपर जाएंट्सचा कॅप्टन होता. मात्र आयपीएल 2025 साठी लखनऊ फ्रेंचायझीने त्याला रिटेन केलेलं नाही. त्यामुळे आता तो आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये दिसेल. 32 वर्षीय केएल राहुल हा सलामीवीर फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 132 सामन्यात 4683 धावा केल्या आहे.   

4/5

श्रेयस अय्यर:

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाइटराइडर्सने 2024 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. परंतु तरीही कोलकाता फ्रेंचायझीने त्याला रिटेन न करता बाहेरचा रस्ता दाखवला. यापूर्वी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स फायनलमध्ये पोहोचली होती, त्यामुळे अय्यर हा स्टार फलंदाज आणि उत्तम कॅप्टन सुद्धा आहे. नुकतंच त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतक सुद्धा ठोकले. त्यामुळे अय्यरवर ऑस्कनमध्ये 20  कोटींहून अधिकची बोली लागू शकते. 

5/5

ईशान किशन :

आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून विकेटकिपर फलंदाज म्हणून भूमिका बजावणाऱ्या ईशान किशनला मुंबई फ्रेंचायझीने आयपीएल 2025 पूर्वी रिलीज केले आहे. ईशान किशन हा विकेटकिपर सह उत्कृष्ट सलामी फलंदाज सुद्धा आहे. आयपीएल 2022 मध्ये मुंबईने त्याला 15.25 कोटींना खरेदी केले होते. तेव्हा मेगा ऑक्शनमध्ये देखील फ्रेंचायझी त्याच्यावर मोठी बोली लावू शकतात.