ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम: श्वेता पैच्या लग्नातील कौटुंबिक फोटो व्हायरल

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत. मात्र, या जोडप्याने नुकतेच एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावून आणि कौटुंबिक फोटो काढून या अफवांना पूर्णविराम दिला आहे.    

Intern | Dec 07, 2024, 17:28 PM IST
1/7

ऐश्वर्या आणि अभिषेक नुकतेच रेडिओलॉजिस्ट डॉ. भुजंग पै यांची मुलगी श्वेता पै हिच्या लग्न सोहळ्यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमातून त्यांच्या कौटुंबिक फोटोंनी सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे. 

2/7

लग्नसोहळ्यात नवविवाहित जोडप्यासोबत ऐश्वर्या आणि अभिषेक फोटो काढताना दिसले. या वेळी ऐश्वर्या रायने काळ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता, तर अभिषेक बच्चनने नेव्ही ब्लू जोधपुरी सूट घातला होता.    

3/7

या लग्न सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती. यात विद्या बालन,आदित्य रॉय कपूर,  हृतिक रोशन, सबा आझाद आणि दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचाही समावेश होता.  

4/7

तसेच, चित्रपट निर्माते अनु रंजन यांनी देखील ऐश्वर्या, अभिषेक, आणि अभिषेकच्या आई वृंदा बच्चन यांच्यासोबतचा एक सेल्फी शेअर केला. फोटोसोबत अनु रंजनने लिहिले, 'खूप प्रेम'.

5/7

काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगी आराध्याचे 13व्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, या फोटोत बच्चन कुटुंबातील इतर सदस्य दिसले नव्हते, ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा अधिक रंगल्या होत्या.  

6/7

घटस्फोटाच्या अफवा कशा सुरु झाल्या?

जुलै महिन्यात अभिषेक बच्चनने अनंत आणि राधिकाच्या लग्नाला संपूर्ण कुटुंबासह हजेरी लावली होती. मात्र, त्या वेळी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या त्याच्यासोबत नव्हत्या. अभिषेक रेड कार्पेटवर दिसल्यानंतर काही वेळाने ऐश्वर्या मुलीसोबत पोहोचली आणि पापाराझींना पोज दिली. त्या समारंभात दोघांनी स्वतंत्रपणे प्रवेश केला आणि एकत्र दिसले नाहीत.  

7/7

यानंतर ऐश्वर्या आपल्या मुलीसोबत सुट्टीवर गेली, पण अभिषेक त्यांच्यासोबत नव्हता. त्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. मात्र, श्वेता पैच्या लग्नसोहळ्यातील फोटोंमुळे या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.