दोघांत तिसरा.. डॉक्टरच्या एन्ट्रीने ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यात दुरावा? 'ते' Photos चर्चेत

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce Talks: अभिषेक आणि ऐश्वर्याच्या दुराव्याच्या कथित चर्चा सुरु असतानाच आता या दोघांमधील वादामागील कारण संपत्ती किंवा मतभेद नसून ऐश्वर्याचाच एक कॉलेज फ्रेण्ड असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिषेक-ऐश्वर्याच्या संसारात मिठाचा खडा ज्याच्यामुळे पडल्याचं बोललं जातंय तो 'दोघांत तिसरा'मधील हा 'तिसरा' आहे तरी कोण पाहूयात..

Swapnil Ghangale | Aug 11, 2024, 10:23 AM IST
1/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यासाठी कारण ठरला 'हा' डॉक्टर? त्याचे ऐश्वर्याबरोबरचे फोटो Viral झाल्यानंतर नेमकी ही व्यक्ती आहे कोण आणि काय चर्चा सुरु आहे हे पाहूयात...

2/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

बॉलिवूडमधील गोल्डन कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या संसारामध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. मात्र आता यामध्ये ऐश्वर्याच्या एका मित्राचं नावही गोवलं जात आहे.  

3/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

मागील अनेक महिन्यांपासून ऐश्वर्याचं बच्चन कुटुंबियांनी आणि पर्यायाने नवऱ्याशी बिनसल्याची चर्चा असून अनेक कार्यक्रमांमध्येही बच्चन कुटुंबाची सुनबाई तिची मुलगी आराध्याबरोबर एकटीच दिसून येते आणि संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र पाहायला मिळलं.

4/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

असेच काहीसे चित्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या लग्न सोहळ्यामध्ये पाहायला मिळालं. एकेकाळी मीस वर्ल्ड राहिलेली ऐश्वर्या तिच्या लेकीबरोबर म्हणजेच आराध्याबरोबर एकटीच या सोहळ्याला आली होती. नंतर संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आलं. त्यामुळे दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बनिसल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला.

5/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

संपत्तीचा वाद, वैचारिक मतभेद अशी अनेक कारणं ऐश्वर्या आणि अभिषेकमधील कथित वादाला कारणीभूत असल्याची चर्चा असतानाच आता या दोघांमध्ये एक तिसरा आल्याने दोघे दुरावल्याची चर्चा जोर धरत आहे. या दोघात तिसरामधील तिसरी व्यक्ती कोण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर झिराक मार्कर!

6/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

झिराक हा ऐश्वर्याचा अत्यंत जवळचा मित्र आहे. मागील काही काळामध्ये पापाराझींनी अनेकदा ऐश्वर्या आणि झिराक यांना एकत्र एकाच फ्रेममध्ये टीपलं असून दोघांचं एकमेकांशी मनमोकळेपणे गप्पा मारताना वगैरे दिसत आहेत. त्यामुळेच या दोघांमध्ये काही सुरु आहे की काय अशी चर्चा मनोरंजन सृष्टीमध्ये सुरु झाली आहे.   

7/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

सोशल मीडियावर तर ऐश्वर्या आणि झिराकसंदर्भात अनेक शक्यता व्यक्त केलेल्या जात असतानाच या दोघांमधील जवळकी वाढल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकचं बिनसल्याचं अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे.  

8/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

ऐश्वर्या काही काळापूर्वी डॉ. झिराकच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहिली होती. 

9/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

पॅरेंटींग इन एज ऑफ अॅनेक्सीटी हे पुस्तक डॉक्टर झिराक यांनी लिहिलं आहे. डॉक्टर झिराक हे चाइल्ड आणि एडल्ट फिजिशएनिस्ट तसेच सायकोथेरिपिस्ट आहेत. जय हिंद कॉलेजपासून ऐश्वर्या आणि डॉक्टर झिराक एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

10/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

डॉक्टर झिराक मार्कर अनेकदा त्यांची पत्नी प्रिया मार्करबरोबर ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्यासहीत भटकंतीला गेल्याचे फोटो पाहायला मिळाले आहेत.  

11/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

अभिषेक बच्चनने मध्यंतरी ग्रे डिव्होर्ससंदर्भातील एका इन्स्टाग्राम पोस्टला लाईक केल्याने त्याचं पत्नी ऐश्वर्याबरोबर काहीतरी नक्कीच बिनसलं असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरु झाली. या पोस्टमध्ये लेखिका हिना खंडेलवाल यांनी दिर्घकाळ असणारं नातं संभाळताना वय वाढत जातं तेव्हा कशा समस्या निर्माण होतात याबद्दल भाष्य केलेलं. 

12/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

अभिषेकने ही पोस्ट लाइक केल्याने प्रसारमाध्यमांपासून चाहत्यांपर्यंत अनेकांनी अभिषेकच्या वैवाहिक आयुष्यातही नक्कीच काहीतरी अडचण आहे असं गृहित धरुन सोशल मिडियावर चर्चासत्र भरवली. कमेंट्स, लाइक्स आणि शेअरचा पाऊस पाडला. तेव्हापासूनच या दोघांमधील दरी अधिक वाढत असल्याचीही चर्चा आहे.

13/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

विशेष म्हणजे आता अभिषेकने लाईक केलेल्या या घटस्फोटासंदर्भातील पोस्टचा सहलेखक हा ऐश्वर्याचा मित्र असलेला डॉक्टर झिराक मार्करच असल्याचं स्पष्ट झाल्याने या प्रकरणाचा अधिक नाट्यमय वळण मिळालं आहे. 

14/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

ऐश्वर्या तसेच अभिषेकनेही या कथित चर्चांवर सार्वजनिकपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र या दोघांचं एकत्र दिसणं कमी झालं आहे. दोघेही अनेक कार्यक्रमांना वेगवेघली हजेरी लावत असल्याने नक्कीच काहीतरी गडबड असल्याची चर्चा आहे. 

15/15

Aishwarya Abhishek Divorce Zirak Marker

आता ऐश्वर्या अभिषेकसंदर्भात या 'दोघांत तिसरा' चर्चा केवळ अफवाच असल्याची दाट शक्यता असली तरी यासंदर्भात कोणीही काहीही अधिकृत भाष्य केलेलं नाही. मात्र यामुळे चाहत्यांना चर्चेचा नवा विषय मिळाला आहे हे मात्र नक्की.