Aishwarya Rai Flop Movie: ऐश्वर्या रायचा सर्वात फ्लॉप चित्रपट, प्रियंकाने दिला होता नकार, फक्त इतकी केली होती कमाई

Aishwarya Rai Biggest Flop Movie: ऐश्वर्या रायने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण तिच्या सर्वात फ्लॉप चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 19.52 कोटींची कमाई केली होती. कोणता आहे चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Nov 07, 2024, 12:36 PM IST
1/7

ऐश्वर्या राय

ऐश्वर्या राय बच्चन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

2/7

इरुवर

1994 मध्ये अभिनेत्रीने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. तिचा पहिला चित्रपट 'इरुवर' 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. 

3/7

40 पेक्षा जास्त चित्रपट

ऐश्वर्याने तिच्या 27 वर्षांच्या करिअरमध्ये 40 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये तिचे काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉप झाले. 

4/7

फ्लॉप चित्रपट

ऐश्वर्या रायने 18 वर्षांपूर्वी एक चित्रपटामध्ये काम केले होते, जो बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 19.52 कोटींची कमाई केली होती. 

5/7

उमराव जान

2006 मध्ये ऐश्वर्याचा 'उमराव जान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये अभिषेक बच्चन देखील होता. ऐश्वर्या रायचा हा पहिला चित्रपट होता. पण प्रेक्षकांना तो आवडला नाही. 

6/7

प्रियंका चोप्रा

'उमराव जान' चित्रपटासाठी ऐश्वर्या राय ही दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हती. यापूर्वी या चित्रपटाची ऑफर प्रियंका चोप्राला आली होती. पण तिने नकार दिला होता. 

7/7

19.52 कोटींची कमाई

'उमराव जान' या चित्रपटाचे बजेट 23 कोटी होते. पण भारतात या चित्रपटाने केवळ 7.42 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने 19.52 कोटींची कमाई केली होती.