'या' अभिनेत्रीला मुख्यमंत्र्यांशी करायचं होतं लग्न, प्रपोजही केलं पण..; आयुष्यभर प्रेमासाठी राहिली झुरत

This Actress Wanted To Marry Chief Minister: एक काळ तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने गाजवला. आपल्या सौंदर्याबरोबरच अभिनयनाने अनेकांना भूरळ पारडणाऱ्या या अभिनेत्रीने अविवाहित राहूनही एकल मातृत्वाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. ही अभिनेत्रीला अनेक विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली. यामध्ये एका माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता. तिने मुख्यमंत्र्यांना लग्नाची मागणीही घातली. कोण आहे ही अभिनेत्री आणि नेमकं काय घडलं यानंतर पाहूयात...

Swapnil Ghangale | Feb 24, 2024, 16:08 PM IST
1/14

Actress Wanted To Marry Chief Minister

या अभिनेत्रीचा जन्म आजच्या तारखेला म्हणजेच 24 जानेवारी रोजी 1948 साली झाला होता. लहानपणीच तिचं पितृछत्र हरपलं. आईने मुलीचं पालनपोषण करुन मोठं केलं. मोठी झाल्यानंतर ही अभिनेत्री केवळ भारतातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी झाली.   

2/14

Actress Wanted To Marry Chief Minister

मनोरंजन क्षेत्रातील आपल्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये तिने 140 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्याची चर्चाच अधिक राहिली. या अभिनेत्रीचं मुख्यमंत्र्यांबरोबरचं प्रेमप्रकरण आणि राजकीय वाटचालही चर्चेचा विषय ठरली.

3/14

Actress Wanted To Marry Chief Minister

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय त्या अभिनेत्रीचं नाव आहे जयललिता जयराम! त्यांना अभिनय क्षेत्रातून राजकारणात गेलेल्या एम. जी. रामचंद्रन यांच्या रुपात आधार सापडला.  

4/14

Actress Wanted To Marry Chief Minister

एमजीआर जेव्हा अभिनय क्षेत्रात सक्रीय होते तेव्हा त्यांनी जयललिताबरोबर 28 सुपरहिट चित्रपट केले. पुढे ते जयललितांना राजकीय जीवनामधील मार्गदर्शक म्हणून मदत करत राहिले.  

5/14

Actress Wanted To Marry Chief Minister

जयललितांचा राजकारणातील प्रवेशही एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असाच आहे. आपल्या करिअरमध्ये सर्वोच्च स्थानी असताना जयललिता दिग्गज अभिनेते शोभन बाबू यांच्या प्रेमात पडल्या. हे दोघेही अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसायचे.  

6/14

Actress Wanted To Marry Chief Minister

शोभन बाबू विवाहित आहेत हे ठाऊक असूनही जयललिता त्यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी चक्क लग्नासाठी शोभन बाबू यांना मागणी घातली.  

7/14

Actress Wanted To Marry Chief Minister

शोभन बाबू यांनी जयललितांबरोबर केलेला 'डॉक्टर बाबू' हा दुर्देवाने त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. जयललिता यांचे निकटवर्तीय असलेले एमजीआर राजकारणामध्ये सक्रीय होते. त्यांनीच जयललितांना राजकारणामध्ये येण्याचा सल्ला दिला.

8/14

Actress Wanted To Marry Chief Minister

जयललिता यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमजीआर यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या एआयएडीएमके पक्षात प्रवेश केला. पक्षात त्याचं वाढतं महत्त्व पाहून त्यांना पक्षातील नेते आणि विरोधी पक्षही लक्ष्य करु लागले.  

9/14

Actress Wanted To Marry Chief Minister

जयललिता यांनी आपल्या मनाची गोष्ट ऐकली आणि विवाहित एमजीआर यांच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र एमजीआर यांनी कधीच जयललिता यांना पत्नीचा दर्जा दिला नाही.  

10/14

Actress Wanted To Marry Chief Minister

अशी चर्चाही होती की जयललिता यांचं लग्न त्यांचे कौटुंबिक मित्र अरुण कुमार यांच्याशी होता-होता राहिलं. लग्न करण्याची त्यांची इच्छा शेवटपर्यंत पूर्ण झाली नाही. लग्न आणि प्रेम आपल्या नशिबात नाही हे जयललिता यांना कळून चुकलं होतं. त्यानंतर त्यांनी आपला भाचा शुधाकरणला दत्तक घेतलं आणि एकल मातृत्व स्वीकारलं.  

11/14

Actress Wanted To Marry Chief Minister

एमजीआर यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या जोरावरच जयललिता यांनी तामिळनाडूच्या राजकारणामध्ये अढळ स्थान निर्माण केलं. त्यांचा प्रभाव इतका आहे की आजच्या घडीला जयललितांच्या मृत्यूला 4 वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांच्या नावाचा वापर तामिळनाडूच्या राजकारणात केला जातो.  

12/14

Actress Wanted To Marry Chief Minister

1991 साली जयललितांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद स्वीकारलं. तामिळनाडूच्या सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री म्हणून त्या खुर्चीवर बसल्या. सलग 6 टर्म त्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.  

13/14

Actress Wanted To Marry Chief Minister

जयललिता यांनी गरिबांसाठी बरंच काम केलं. मात्र त्यांचं नाव सतत या ना त्या राजकीय वादात घेतलं गेलं. लोक त्यांना प्रेमाने अम्मा म्हणायचे.  

14/14

Actress Wanted To Marry Chief Minister

जयललितांच्या आयुष्यावरआधारित 'थलायवी' नावाचा एक चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झालेला. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कंगना राणौतने जयललितांची भूमिका साकारली होती.