PHOTO: आज काय खर नाय, शिवाली परबचं हटके फोटोशूट चर्चेत, तुम्ही पाहिलं का?

Shivali Parab Photoshoot: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब नेहमी चर्चेत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केले आहेत. 

Soneshwar Patil | Jul 31, 2024, 18:38 PM IST
1/7

सौंदर्य क्वीन

सौंदर्य क्वीन अभिनेत्री शिवाली परब नेहमी तिच्या हटके स्टाईलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. 

2/7

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ती खूप लोकप्रिय झाली आहे. अभिनयातून तिने जगभरातील अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

3/7

कल्याणची चुलबुली

सौंदर्यासोबतच शिवाली परब ही सोशल मीडियावर 'कल्याणची चुलबुली' म्हणून देखील खूप प्रसिद्ध आहे. 

4/7

फोटो शेअर

अभिनेत्रीने नुकतेच तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिची हटके स्टाईल पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत. 

5/7

सुंदर लुक

मोकळे केस, डोळ्यावर गॉगलमध्ये ती खूपच आकर्षित दिसत आहे.  या फोटोमध्ये तिने तपकिरी रंगाचा वेलवेट ड्रेस परिधान केला आहे. 

6/7

हटके कॅप्शन

अभिनेत्रीने हे फोटो शेअर करताना त्यांना ‘Corps De Serpent’ असं कॅप्शन दिलं आहे. 

7/7

लाईक्सचा वर्षाव

चाहत्यांनी देखील तिच्या या फोटोंवर तुफान कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.