'आम्हाला फोन वापरण्यास परवानगी नव्हती, नाहीतर...'; 'हिरामंडी' फेम अभिनेत्रीने सांगितला भन्साळींसोबत काम करण्याचा अनुभव

| Apr 29, 2024, 19:05 PM IST
1/8

चित्रपटाचे प्रमोशन सुरु

Actress Richa Chadha reveals no phones were allowed on Heeramandi

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हिरामंडी ही वेबसीरिज येत्या 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे.

2/8

'हिरामंडी' ही पहिलीच वेबसीरिज

Actress Richa Chadha reveals no phones were allowed on Heeramandi

या वेबसीरिजच्या निमित्ताने संजय लीला भन्साळी हे ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'हिरामंडी' ही त्यांची पहिलीच वेबसीरिज आहे  

3/8

190 देशात प्रदर्शित होणार

Actress Richa Chadha reveals no phones were allowed on Heeramandi

या वेबसीरिजमध्ये स्वातंत्र्यापूर्वी वेश्यावस्तीतील जीवन कसं होतं, त्यांचा समाजात वावर कसा असायचा अशा स्त्रियांची कहाणी यातून मांडली जाणार आहे. ही वेबसीरिज 190 देशात प्रदर्शित होणार असून याचे 8 भाग असणार आहेत.  

4/8

या अभिनेत्री मुख्य भूमिकेत

Actress Richa Chadha reveals no phones were allowed on Heeramandi

या वेबसीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिती राव हैदरी, ऋचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेहगल या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.  

5/8

ऋचा चड्ढाने संजय लीला भन्साळींसोबत शूटींगचा अनुभव

Actress Richa Chadha reveals no phones were allowed on Heeramandi

या वेबसीरीजचे पोस्टर, गाणी आणि ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आता अभिनेत्री ऋचा चड्ढाने संजय लीला भन्साळींसोबत शूटींग करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल सांगितले.  

6/8

ते माझ्याच पात्राबद्दल चर्चा करत होते

Actress Richa Chadha reveals no phones were allowed on Heeramandi

ऋचा चड्ढाने 'हिरामंडी' या वेबसीरिजमध्ये लज्जो हे पात्र साकारलं आहे. यानिमित्ताने तिने हिंदुस्थान टाईम्सला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली, "मी जेव्हा पहिल्यांदा या वेबसीरिजच्या सेटवर गेली, तेव्हा ते माझ्याच पात्राबद्दल चर्चा करत होते."

7/8

सर्वात मोठ्या सेटपैकी एक

Actress Richa Chadha reveals no phones were allowed on Heeramandi

"संजय लीला भन्साळी यांनी हिरामंडीसाठी बनवलेला सेट हा सर्वात मोठ्या सेटपैकी एक होता. हा सेट फिल्मसिटीच्या सर्वाधिक क्षेत्रफळावर पसरलेला आहे", असे ऋचा चड्ढाने म्हटले.   

8/8

फोन वापरण्यास परवानगी नव्हती

Actress Richa Chadha reveals no phones were allowed on Heeramandi

या सेटवर सर्व सुविधा देण्यात आल्या होत्या. पण आम्हाला सेटवर फोन वापरण्यास परवानगी नव्हती. जर मला फोन वापरण्यास परवानगी असती, तर मी तिथे सर्व काही रेकॉर्ड केले असते. या सेटवर बारीकसारीक गोष्टीही दिसत होत्या, असे ऋचा चड्ढाने सांगितले.