Cervical Cancer ने घेतला पूनम पांडेचा जीव! महिलांनो 'या' 10 लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

Poonam Pandey Died Due To Cervical Cancer Know The Symptoms: अभिनेत्री पूनम पांडेचं आकस्मिक निधन झाल्याचं वृत्त शुक्रवारी अचानक समोर आलं. पूनमचं निधन सर्वाइकल कॅन्सरमुळे झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र सर्वाइकल कॅन्सर म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत यासंदर्भातील माहिती अनेक महिलांना तसेच त्यांच्या जोडीदार पुरुषांना नसते. सामान्य वाटणारी ही लक्षणं अनेकींच्या लक्षात येत नाहीत त्यामुळेच या लक्षणांबद्दल अधिक जागृत राहणं आवश्यक आहे. त्याचसंदर्भात जनजागृतीसाठी आपण निधन झाल्याचा दावा केल्याचं पूनमने दुसऱ्या दिवशी जाहीर केलं. आपण याचनिमित्ताने सर्वाइकल कॅन्सर जाणून घेणार आहोत...

Swapnil Ghangale | Feb 03, 2024, 12:50 PM IST
1/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं (Poonam Pandey) वयाच्या 32 व्या निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. मात्र दुसऱ्याच दिवशी पूनम पांडेने आपण ही घोषणा जनजागृतीसाठी केल्याचं जाहीर केलं.

2/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे (cervical cancer) पूनम पांडेचा मृत्यू झाला आहे असं सांगण्यात आलं होतं. 

3/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर (cervical cancer) हा महिलांमधील सायलेंट किलर आजार म्हणून ओळखला जातो. याचबद्दल जगजागृती करण्यासाठी पूनमने ही पोस्ट केलेली.

4/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

अनेक महिलांना आपल्याला असा काही कॅन्सर आहे याची कल्पनाच नसते. त्यामुळेच याची लक्षणं जाणून घेणं महत्त्वाचं आहे.  

5/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

योनीतून पांढऱ्या पदार्थाचा स्त्राव झाल्यानंतर त्याची तीव्र दुर्गंधी येणं हे सर्वाइकल कॅन्सर लक्षणं असू शकतं.

6/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

योनीमधून रक्ताने रंगलेला स्त्राव होत असल्यासं हे सर्वाइकल कॅन्सरचं लक्षण मानलं जातं.

7/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

लैंगिक संभोग दरम्यान अस्वस्थ वाटण्याचा संबंधही सर्वाइकल कॅन्सरशी असतो.

8/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये रक्तस्त्राव होत असेल तर सर्वाइकल कॅन्सरचा धोका असू शकतो असं म्हटलं जातं.

9/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

मासिक पाळी दरम्यान अती जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असेल तर हे अशा महिलांना सर्वाइकल कॅन्सरसंदर्भात चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला जातो.

10/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

लैंगिक संभोगानंतर रक्तस्त्राव होणं हे सर्वाइकल कॅन्सरच्या लक्षणापैकी एक आहे.

11/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

अचानक ओटीपोटात वेदना होणे हे सुद्धा सर्वाइकल कॅन्सरचं लक्षण आहे.

12/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

लघवी करताना किंवा मलविसर्जनादरम्यान वेदना जाणवणे हे सुद्धा सर्वाइकल कॅन्सरकडे इशारा करणारं लक्षण आहे.

13/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

पायांना सूज येणं हे सुद्धा सर्वाइकल कॅन्सरचं लक्षणं मानलं जातं.

14/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

लघवीमध्ये रक्त पडणं हे सर्वाइकल कॅन्सरचा इशारा देणारा महत्त्वाचा संकेत मानला जातो.

15/15

poonam pandey death due to cervical cancer know the symptoms

Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांबरोबर चर्चा करुन कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.