सॅमसंगचे स्मार्टफोन वापरणाऱ्यासांठी अत्यंत धोक्याचा इशारा! एका क्षणात काही होवू शकते

सॅमसंगच्या स्मार्ट फोनमध्ये अँड्रोईड 11, 12, 13 आणि 14 ही चार व्हर्जन असेल तर फोन हॅक होवू शकतो. 

Dec 17, 2023, 19:17 PM IST

Alert For Samsung Users : सॅमसंगचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. सॅमसंगच्या ज्या स्मार्ट फोनमध्ये अँड्रोईड 11, 12, 13 आणि 14 ही चार व्हर्जन आहेत. त्यांचे मोबाईल फोन सायबर हल्ल्यांचे बळी ठरु शकतात असा इशारा कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अर्थात सीईआरटी इन या केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या समितीनं दिलाय.

1/7

 सीईआरटीने नुकत्याच केलेल्या संशोधनातून सॅमसंगचे काही विशिष्ट मोबाईल हँकिंगचे बळी ठरु शकतात, असं समोर आलंय.

2/7

सॅमसंगच्या प्रोडक्ट्स मध्ये अनेक त्रुटी आहेत. हॅकरनं त्रुटींचा वापर केला तर तो संपूर्ण डिव्हाइसवर ताबा मिळवू शकतो. तसेच तुमच्या खाजगी माहिती पर्यंत पोहचू शकतो.    

3/7

सरकारने आपल्या ॲडव्हायझरीमध्ये सॅमसंग स्मार्टफोन सिस्टम अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.   

4/7

सॅमसंग स्मार्टफोन मॉडेल्समध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या कंपनीच्या नॉक्स (Knox) सुरक्षा प्रणाली वैशिष्ट्याशी संबंधित आहेत असं सरकारच्या सायबर सुरक्षा टीमने म्हटले आहे.

5/7

भारत सरकारकडून CERT-In ने सॅमसंग युजर्संना CIVN-2023-0360 हा इशारा दिला आहे. 

6/7

Samsung मधील काही त्रुटींमुळे हॅकर्स युजर्सची संवेदनशील माहिती ऍक्सेस करू शकतात.   

7/7

सायबर हल्ले टाळायाचे असतील तर सॅमसंग फोन धारकांनी त्यांच्या फोनचं सॉफ्टवेअर तात्काळ अपडेट करुन घ्यावे असंही सीईआरटीने म्हटलंय.