महाराष्ट्रातील 963 वर्ष जुनं प्राचीन शिवमंदिर; मुंबईपासून फक्त तासाभराच्या अंतरावर

Ambernath Shiv Mandir : अंबरनाथ येथील शिवमंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे. संपूर्ण भारतातून भाविक आणि पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी येतात. 

वनिता कांबळे | Feb 21, 2024, 23:49 PM IST

Ambernath Shiv Mandir History :  भारत ही देवांची भूमी आहे असं मानल जातं. भारतात अनेक देवी-देवतांची प्राचीन मंदिरे आहेत. असचं एक प्राचीन मंदिर मुंबईच अगदी जवळ असलेल्या अंबरनाथमध्ये आहे. हे मंदिर तब्बल 963 वर्ष जुनं आहे. या मंदिराची कलाकृती पाहून थक्क व्हाल.

1/7

अंबरनाथचे शिवमंदिर हे महाराष्ट्रातील भूमीज शैलीचे सर्वात प्राचीन मंदिर आहे.

2/7

इतर मंदिरांप्रमाणे या मंदिराचा कोणताही ट्र्स्ट स्थापन झालेला नाही. त्यामुळे या मंदिराचा वारसा तेथील मूळ पाटलांच्या नावावर आहे.मंदिराची पूजा आणि देखभाल करण्याच कामही तेच करतात. 

3/7

 हे मंदिर खूप पुरातन काळतील असल्याकारणाने या मंदिरात दररोज अनेक भाविक भेट देतात. हे एक जागृत देवस्थान असल्याचा दावा भाविक करतात.

4/7

महाशिवराञी आणि श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पहायला मिळते.  

5/7

अंबरनाथमधील शिवमंदिर हे शिल्पजडीत आहे. मंदिरातील स्तंभांवर अनेक देवी-देवतांचे शिल्प साकारलेले आहेत. या मंदिराच्या शेजारी झुळझुळ वाहणारा पाण्याचा ओढा आहे.

6/7

या मंदिरांची निर्मीती शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात झाली आहे. हे मंदित इ.स. 1060  मध्ये बांधण्यात आल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो.  

7/7

अंबरनाथमध्ये असलेल्या प्राचीन शिव मंदिराला भेट द्यायची असेल तर हे मंदिर अंबरनाथ रेल्वेस्थानकापासून साधारण 1KM अंतरावर आहे. अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरुन रिक्षा पकडून येथे जाता येते.