उद्धव ठाकरे यांच्यासह 9 जणांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ
May 18, 2020, 13:44 PM IST
1/4
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 जणांनी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी या 9 सदस्यांना शपथ दिली. यावेळी भाजपचे गोपीचंद पडाळकर धनगर वेशात शपथविधीसाठी विधानभवनात दाखल झाले होते.
2/4
विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्यांना सोमवारी सदस्यत्वाची शपथ दिली गेली.
TRENDING NOW
photos
3/4
शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, तर भाजपचे रमेश कराड, प्रविण दटके, गोपीचंद पडाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांचा सदस्यत्वाची शपथ घेतली.
4/4
केंद्रीय निवडणूक आयोगाने २१ मे रोजी या नऊ जागांसाठी मतदान घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, नऊ जागांसाठी 9 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली होती.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.