#75 th Independence day: स्वातंत्र्याचा अमृतोत्सव... सलग नवव्या वर्षी मोदींच्या फेट्याची शान कायम...

आज भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन... स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हजारो स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस... 

Aug 15, 2022, 08:09 AM IST

आज भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन... स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हजारो स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस... देशाला नवी दिशा देणारं, स्वातंत्र्य, समता एकतेचं महत्त्व सिद्ध करणारा आजचा हा स्वातंत्र्यदिन देश साजरा करत आहे. सगल नऊ वर्ष स्वातंत्र्यदिना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. रुबाबदार अंदाज आणि साजेशी वेशभूषा यासाठीही चर्चेत असणाऱ्या मोदींनी खऱ्या अर्थाने फेट्याची त्यांची ही परंपरा यंदाच्या वर्षीही कायम ठेवली. 

1/9

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2014 साली भारत देशाच्या पंतप्रधानपदी पहिल्यांदाच विराजमान झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल रंगाचा फेटा बंधून देशातील नागरिकांना संबोधित केले होते.       

2/9

2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2015 मध्ये भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होता.       

3/9

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

हवेतच्या दिशेने मोठ्या शानमध्ये उडणारा मोदींचा गुलाबी रंगाचा राजस्थानी फेटाही तितकाच खास ठरला होता. 2016 मध्ये त्यांचा हा फेटा पाहायला मिळाला होता.     

4/9

2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

 प्रत्येक वर्षी फेट्याची शान कायम राखणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2017 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल आणि पिवळ्या रंगाचा चौकटींची डिझाईन असणारा फेटा बांधला होता.      

5/9

2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशरी रंगाचा फेटा बांधला होता. तेव्हा देखील त्यांच्या फेट्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगल्या होत्या.         

6/9

2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2019 वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी बहुरंगी फेट्याला पसंती दिली होती.      

7/9

2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केशरी आणि क्रिम रंगाचा फेटा बांधला होता.     

8/9

2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

गेल्यावर्षी म्हणजे 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या रंगाचा फेटा घातला आहे. त्यांच्या फेट्यावर लाला रंगाच्या छटा होत्या. त्यांचा रुबाबदार अंदाज आणि साजेशी वेशभूषा कायम चर्चेचा विषय ठरतो.     

9/9

2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फेट्याची शान

स्वातंत्र्याचा अमृतोत्सव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पांढऱ्या रंगाचा फेटा घातला आहे. मोदी यांच्या पांढऱ्या रंगाच्या फेट्यावर केशरी आणि हिरव्या रंगाच्या छटा प्रचंड आकर्षक दिसत आहेत.