राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; जून महिन्यात मोठी पगारवाढ, चला आकडेमोड करा

7 th pay commission : गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी खात्यातील नोकऱ्यांकडे तरुणाईचाही कल वाढताना दिसत आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे विविध विभागांमध्ये असणारी काम करण्याची संधी आणि शासनाकडून लागू होणारे वेतन आयोग.   

May 25, 2023, 08:00 AM IST

Government Employees Salary Hike : सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्यांना फक्त सुट्ट्या आणि सरकारी सवलतींचाच फायदा मिळत नाही, तर वेळोवेळी केंद्राकडून देण्यात येणाऱ्या पगार आणि भत्तेवाढीला फायदाही त्यांना मिळतो. म्हणूनच म्हणतात, सरकारी कर्मचाऱ्यांची बातच न्यारी. 

1/7

आनंदाची बातमी

7 th pay commission benefits Maharashtra state government employees to get salary hike know details

नुकतीच महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण, जून महिन्यात खात्यात येणाऱ्या पगाराचा आकडा मोठा असणार आहे. 

2/7

वेतनवाढ

7 th pay commission benefits Maharashtra state government employees to get salary hike know details

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या थकबाकीचा चौथा हप्ता जून महिन्यातील वेतनासोबतच दिला जाणार आहे.   

3/7

सेवानिवृत्त कर्मचारी

7 th pay commission benefits Maharashtra state government employees to get salary hike know details

(Retired) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही थकबाकी रोख स्वरुपात मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.  राज्याच्याच वित्त विभागाकडून यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत. 

4/7

सातवा वेतन आयोग लागू

7 th pay commission benefits Maharashtra state government employees to get salary hike know details

1 जानेवारी 2016 पासूनच राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. पण, त्याची अंमलबजावणी मत्र 2019 पासून करण्यात आली.   

5/7

तीन वर्षांमधील थकबाकी

7 th pay commission benefits Maharashtra state government employees to get salary hike know details

तीन वर्षांमधील थकबाकी ही पुढच्या पाच वर्षांमध्ये समसमान हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यापैकी दोन हप्ते कर्मचाऱ्यांना देण्यात आले असल्याचं म्हटलं जात आहे. 

6/7

तिसरा हप्ता लांबला

7 th pay commission benefits Maharashtra state government employees to get salary hike know details

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळं आर्थिक बोजा वाढल्यानं उर्वरित हप्ते लांबले आणि तिसरा हप्ता काहीसा दिरंगाईनं देण्यात आला. ज्यामागोमाग आता चौथा हप्ता कर्मचाऱ्यांच्या पगारात जमा केला जाणार आहे. 

7/7

कोणाला मिळणार फायदा?

7 th pay commission benefits Maharashtra state government employees to get salary hike know details

जिल्हा परिषद, शासन अनुदानित शाळा, अनुदानित सरकारी संस्था आणि इतर विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतनात ही वाढीव रक्कम येईल.