शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करतील हे '5' पदार्थ

Apr 08, 2018, 13:05 PM IST
1/6

लसूणामध्ये शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे  हृद्यविकाराचा धोका कमी होतो. रक्ताच्या क्लॉटिंग  होण्याच्या प्रक्रियेलाही चालना मिळते. 

2/6

ब्लॅक टी, ग्रीन टी चा आहारात समावेश करणं फायदेशीर आहे. यामध्ये असणारे अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक असल्याने आरोग्याला त्याचा फायदा होतो. वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबतच रक्ताच्या क्लॉटिंंग  करण्याच्या प्रक्रियेलाही चालना मिळते. 

3/6

दिवसाची सुरूवात फळाने करणेही फायदेशीर आहे. संत्र्याचा आहारात समावेश केल्यास कोलेस्टेरॉलचं प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते. संत्र्यातील व्हिटॅमिन सी आरोग्याला पोषक आहे. 

4/6

राजमा - राजम्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते, वाईट कोलेस्टेरॉलचा धोका कमी होतो. तसेच त्यामध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पचनाची क्रियादेखील सुधारते.  

5/6

सफरचंदामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं सोबतच वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते. 

6/6

शरीरात चांंगले आणि वाईट दोन्ही स्वरूपाचे कोलेस्टेरॉल असतात. मात्र वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं की हृद्यविकार, रक्तदाबाच्या समस्या वाढतात. म्हणूनच त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं हे फयदेशीर ठरते.